शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
2
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
3
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
5
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
6
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
7
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
10
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
11
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
12
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
13
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
14
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
15
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
16
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
17
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
18
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
19
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
20
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 

मालट्रकवर बस आदळली

By admin | Updated: December 10, 2015 23:51 IST

तारवाला चौकातील घटना : चौघे जखमी, बसचालक फरार; सिग्नल तोडल्याचा परिणाम

नाशिक : सकाळच्या सुमारास दिंडोरीकडून नाशिककडे येणाऱ्या महामंडळाच्या बसचालकाने तारवालानगर सिग्नलकडे दुर्लक्ष करून सिग्नल ‘रेड’ असतानाही बस पुढे दामटवण्याचा प्रयत्न केला. परिणामी रासबिहारी रस्त्यावरून येत असलेल्या मालट्रकवर बस जाऊन धडकल्याने गंभीर अपघात घडल्याची माहिती पंचवटी पोलिसांनी दिली आहे. सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळली असून, दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. यामध्ये महिला बस वाहकाचाही समावेश आहे.सकाळी नऊ वाजेच्या सुमारास दिंडोरीकडून नाशिककडे जाणारी महामंडळाची बस (एमएच१४ बीटी ०७४२) भरधाव वेगाने तारवालानगर सिग्नलवर आली. यावेळी सिग्नल लागलेला होता; मात्र बसचालकाने ‘लाल दिव्या’कडे दुर्लक्ष क रत बस पुढे नेल्याने त्याचे नियंत्रण सुटले. दरम्यान, रासबिहारी रस्त्याने आलेल्या आयशर मालट्रकवर (जीजे १५ वाय वाय ३३७७) बस जाऊन धडकल्याचे पोलिसांनी सांगितले. यावेळी पेठरोड रस्त्याचा सिग्नल हिरवा असल्याने मालट्रक चौफुली ओलांडत होता. बसची धडक बसल्याने दुभाजकावर ट्रक पलटी झाला. यामध्ये हिरावाडीकडून पेठरोडकडे जाण्यासाठी झेब्राच्या आत सिग्नलच्या प्रतीक्षेत उभी असलेली चारचाकी मोटार (एमएच १५ ईएक्स ८४४) दाबली गेली. पंचवटी पोलिसांनी अपघातप्रकरणी बसचालकाला संशयित म्हणून जबाबदार धरले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर बसचालक घटनास्थळावरून फरार झाला असून, त्याचा पोलीस रात्रीपर्यंत शोध घेत होते. बसवाहक सुरेखा महेंद्र विभांडिक (४०) यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अन्य जखमींची नावे समजू शकलेली नाहीत. (प्रतिनिधी)