शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानक झाले बोलके!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 00:15 IST

बसस्थाकातील माइक आणि स्पीकर दुरुस्त होताच चौकशी कक्षातून होणाऱ्या सूचनांमुळे प्रवाशांची गैरसोय थांबली आहे. मुके झालेले बसस्थानक पुन्हा बोलके झाल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत : स्पीकर, माइक दुरुस्त केल्याने चौकशी कक्ष पूर्ववत

पिंपळगाव बसवंत : येथील बसस्थाकातील माइक आणि स्पीकर दुरुस्त होताच चौकशी कक्षातून होणाऱ्या सूचनांमुळे प्रवाशांची गैरसोय थांबली आहे. मुके झालेले बसस्थानक पुन्हा बोलके झाल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केली. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच राज्य परिवहन मंडळास जाग आली असून, इलेक्ट्रॉनिक यंत्रांची दुरुस्ती करण्यात आली आहे.जुन्या अधिकाऱ्यांच्या बदलीनंतर पिंपळगाव आगारचा कारभार हाती घेणाºया आगारप्रमुख विजय निकम यांना त्यासंदर्भात माहिती मिळताच त्यांनी तातडीने दुरुस्तीच्या कामास प्रारंभ केला. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद आगारप्रमुखांच्या कार्यवाहीमुळे सिद्ध झाले असून, स्थानकात अद्ययावत सुविधा मिळण्याची अपेक्षा यानिमित्ताने वाढली आहे. स्थानकाच्या चौकशी कक्षातील स्पीकर आणि माइक बंद पडल्याने प्रवाशांचा गोंधळ होत होता. गाडी कोणती आली आणि कोणत्या फलाटावर लागली किंवा कोणती गाडी केव्हा येणार आहे, याची माहिती प्रवाशांना मिळत नव्हती. अनेकांना गाडी येऊन निघून गेल्यानंतर आपली गाडी चुकल्याचे कटू अनुभवही आले होते. त्यामुळे प्रवाशांनी येथील प्रशासन व कर्मचाºयांवर नाराजी व्यक्त केली होती. अनेकदा प्रवासी व कर्मचाºयांमध्ये वादही होत होते, मात्र नव्याने दाखल झालेल्या आगारप्रमुखांनी तत्काळ कार्यवाही केल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

तीन महिन्यांपासून माइक व स्पीकर बंद होता. संबंधित कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत होते. यामुळे प्रवासी संतप्त होत होते. अनेकांना आपली गाडी कधी येते व कोणत्या फलाटावर लागते हे कळतच नव्हते, तर चौकशी कक्षातील कर्मचारी मनमानी करीत होते. मात्र नव्याने कारभार हाती घेणाºया आगारप्रमुख विजय निकम यांनी तातडीने माइक दुरु स्ती केला व गैरसोय थांबविली आहे. ‘लोकमत’ने हा प्रश्न मांडल्यानेच परिणाम दिसून आला आहे. ‘लोकमत’चे आभार.- मयूर गावडे, सामाजिक कार्यकर्ता

आगाराचा कारभार हाती घेतल्यावर येथील समस्या अगोदर जाणून घेतल्या. त्या सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी नागरिकांनीदेखील सहकार्य करणे गरजेचे आहे. प्रवाशांना सेवा देण्यात स्थानक प्रशासन कटिबद्ध राहील. नागरिकांना कोणतीही अडचण आल्यास त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. कामचुकार कर्मचाºयांवरही वचक ठेवत कारवाई करण्यात येईल.- विजय निकम, आगारप्रमुख

टॅग्स :Bus Driverबसचालक