शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या चारच महिन्यांत सरपंचपदावरून पायउतार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 22:50 IST

नायगाव : सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळा येथील गौरी लहानू पवार यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याने त्यांचे सरपंचपद रद्द ठरविण्यात आले आहे. प्रथमच थेट जनतेतून मिळालेल्या सरपंचपदावरून अवघ्या चारच महिन्यात पायउतार होण्याची राज्यातील पहिलीच घटना असल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.

ठळक मुद्देवडगाव पिंगळा : शासकीय जागेवर अतिक्रमण राजकीय वातावरण तापू लागले

नायगाव : सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळा येथील गौरी लहानू पवार यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याने त्यांचे सरपंचपद रद्द ठरविण्यात आले आहे. प्रथमच थेट जनतेतून मिळालेल्या सरपंचपदावरून अवघ्या चारच महिन्यात पायउतार होण्याची राज्यातील पहिलीच घटना असल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे. गत पंचवार्षिक निवडणुकीत आमदार वाजे गटाकडून थेट सरपंच म्हणून निवडून आलेल्या गौरी लहानू पवार यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेल्या वैयक्तिक माहितीतील सिटी सर्व्हे नंबर ४० मधील मालमत्ता क्र मांक ८९४ चे विटा, माती व सिमेंट पत्र्याचे २० बाय ३० फुटाचे घर शासकीय जागेवर अतिक्रमणात असल्याने पवार यांचे सदस्य व सरपंचपद ग्रामपंचायत अधिनियम १९५८चे कलम १४ नुसार रद्द ठरविण्यात आल्याचा निकाल जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी दिला आहे.आॅक्टोबर २०१७ मध्ये झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत माजी आमदार माणिकराव कोकाटे गटाचे आठ, तर आमदार वाजे गटाचे तीन सदस्य निवडून आले होते. मात्र थेट सरपंच म्हणून गौरी लहानू पवार यांनी कोकाटे गटाच्या कलाबाई काशीनाथ पवार यांना पराभूत करून थेट सरपंच होण्याचा मान मिळवला होता. मात्र शासकीय जागेवर अतिक्रमण करत घर बांधल्याची तक्रार कोकाटे गटाच्या कलाबाई पवार यांनी दाखल केल्याने अवघ्या चारच महिन्यात त्यांना पदावरून पायउतार व्हावे लागले.राज्यातील पहिली घटनाराज्यात प्रथमच थेट जनतेतून सरपंच निवडी निर्णय घेण्यात आला होता. थेट सरपंच होऊनही काही तांत्रिक कारणामुळे जनतेतून आलेल्या सरपंचाचे पद रिक्त होण्याची जिल्ह्यातीलच नाही तर राज्यातील ही पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या घटनेची चांगलीच चर्चा रंगत आहे. अवघ्या चारच महिन्यात गावात पुन्हा राजकीय हालचालीना वेग आला आहे. कोकाटे व वाजे गटाकडून सरपंच पदासाठी उमेदवारांच्या शोधमोहिमेसाठी कोपरा बैठकी सुरू झाल्याने ऐन उन्हाळ्यात वडगाव परिसरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे.