शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

फक्त जागेत बदल, आठवडे बाजार सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 22:20 IST

नांदगाव : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पाश्व'भूमीवर आठवडे बाजार बंद करण्याचे आदेश देऊनही दरवेळेस भरणारा आठवडे बाजार आता फक्त जागा बदलवून समता मार्ग, भोंगळे रस्ता ते दहेगाव नाक्या पर्यंत भरू लागला आहे. त्यामुळे आठवडे बाजार बंदच्या घोषणा केवळ कागदावरच राहिल्याचे दिसून येत आहे. परिणामी शहरात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढताना दिसून येत आहे.

ठळक मुद्देनांदगाव : कोरोना संसर्गाचा वाढता धोका

नांदगाव : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पाश्व'भूमीवर आठवडे बाजार बंद करण्याचे आदेश देऊनही दरवेळेस भरणारा आठवडे बाजार आता फक्त जागा बदलवून समता मार्ग, भोंगळे रस्ता ते दहेगाव नाक्या पर्यंत भरू लागला आहे. त्यामुळे आठवडे बाजार बंदच्या घोषणा केवळ कागदावरच राहिल्याचे दिसून येत आहे. परिणामी शहरात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढताना दिसून येत आहे.शहरात कोरोना १९ या विषाणुने बाधित रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्या पाश्व'भूमीवर प्रशासनाने तातडीने कडक उपाय योजना करणे अत्यावश्यक झाले असल्याचे पत्र ग्रामीण रुग्णालयाचे डॉ रोहन बोरसे यांनी तालुका पातळीवरील प्रशासनास देऊन चार दिवस उलटून गेले आहे. अद्याप रिक्षाच्या माध्यमातून ध्वनिक्षेपकावरून करण्यात येत असलेल्या आवाहनापलीकडे ठोस कारवाई करण्यात येत नसल्याने संसर्गाचा धोका वाढत चालला आहे. नांदगाव शहरातली शासकीय आरोग्य यंत्रणा दररोज ५० पेक्षाही अधिक नमुने तपासणीसाठी पाठवत असून, त्यात ५० टक्क्यांपेक्षा अधिक नमुने संसर्गजन्य आढळून आले आहेत. शासनाने कोरोना प्रादुर्भाव शोध, चाचणी व उपचार या त्रिसूत्रीचा अंमल करण्याच्या कडक सूचना दिल्या नंतरही शहरातील अनेक ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात व त्या अनुषंगाने उपाय योजना करण्यात परिषद प्रशासनाने टोलवा टोलवी चालवली आहे. परिणामी बाजाराच्या गर्दीच्या ठिकाणी अनेकजण बिनधास्तपणे विना मास्कने फिरतांना दिसून येत आहेत.ग्रामीण भागातही वाढला धोकाग्रामीण भागातही पळाशी, सावरगांव, वेहेळगाव, बाणगाव, मल्हारवाडी, भालूर या गावात कोरोनाने पाय पसरवले आहेत. नागरिकांनी नियम पाळले पाहिजे, गर्दी टाळली पाहिजे या बरोबरच प्रशासनाने लघु स्वरूपाचे कंटेनमेंट झोन, नजर ठेवणे आदी उपाय योजना सक्षमतेने करण्याची गरज निर्माण झाली आहे.

 

टॅग्स :Marketबाजारcorona virusकोरोना वायरस बातम्या