शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिंदालच्या वाहनचालकांना लुटणारी टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 01:11 IST

वणी : इगतपुरीच्या जिंदाल पॉलिफिल्म कंपनीच्या वाहनचालकांना चाकूने जखमी करून वाहनासह रोख रकमेची जबरी लूट करणाºया पाच संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेने पकडले असून, एक संशयित फरार आहे. दोन्ही कार पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : सहा संशयितांवर गुन्हा दाखल

वणी : इगतपुरीच्या जिंदाल पॉलिफिल्म कंपनीच्या वाहनचालकांना चाकूने जखमी करून वाहनासह रोख रकमेची जबरी लूट करणाºया पाच संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेने पकडले असून, एक संशयित फरार आहे. दोन्ही कार पोलिसांनी जप्त केल्या आहेत.दि. ४ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास गोंदे एमआयडीसी ता. इगतपुरी येथील जिंदाल पॉलिफिल्म कंपनीचे पिक अ‍ॅण्ड ड्रॉप सेवा देणारा चालक जगदीश मौर्या (राहणार बनारस, उत्तर प्रदेश) हा नाशिक शहरातील द्वारका परिसरात कंपनीचे कर्मचाºयांना सोडून परत येत असताना पाथर्डी फाटा परिसरातून इगतपुरी येथे जाण्यासाठी प्रवासी म्हणून बसलेल्या चार ते पाच इसमांनी सदर स्वीप्ट कार गोंदे एमआयडीसी चौफुली परिसरात जबरदस्तीने थांबवून चाकूने त्यास गंभीर दुखापत केली. यावेळी कार व रोख रकमेची जबरीने लूटमार करत चालकाचे हातपाय बांधून त्यास वणी -सापुतारा रस्त्यावरील पांडाणे शिवारात सोडून दिले होते. सदर घटना घडल्यानंतर १० जानेवारी रोजी गोंदे कंपनीचे चालक राजेंद्र खताळे (रा. वैतरणा, ता. इगतपुरी) यांचेकडील स्कॉर्पिओ कार लुटून नेली आणि वणी-सापुतारा रस्त्यावर खताळे यांना सोडून दिले.या दोन्ही गुन्ह्याचे साम्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी तत्काळ दखल घेत अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांना योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे व पथकाने गस्त व चेक पॉइंटच्या माध्यमातून चौकशी केली. संदीप उर्फबबल्या अभिमन बनगर (२३) रा. कंकराळे, मालेगाव हल्ली रा. चुंचाळे शिवार नाशिक, समाधान रमेश वाघ (१९) रा. कंकराळे मालेगाव हल्ली कुमावतनगर पेठरोड नाशिक, उमेश नामदेव मासुळे (२४), अरुण विठोबा सूर्यवंशी (२०), भूषण विठोबा खेमनार (२० तिघे, रा. कंकराळे मालेगाव) यांची चौकशी केली. सदर गुन्हा करतेवेळी अनिल पाटील (रा. गौताणे, जिल्हा धुळे) हादेखील त्यांचे समवेत असल्याची माहिती पुढे आली. संदीप बनगर, समाधान वाघ, अनिल पाटील हे अंबड एमआयडीसी परिसरातील जेबीएफ व साईकृपा कंपनीत काम करत असून, विविध कंपन्याहमधील वाहनांचे कामकाजाबद्दल त्यांना माहिती होती. त्यांनी योजना आखून पिक अ‍ॅण्ड ड्रॉप करणारे वाहन लुटायचे व विक्र ी करून आपसात पैसे वाटून घ्यायचे अशी त्यांची गुन्ह्याची पद्धत होती. पोलिसांनी संशयित आरोपींना अटक केली असून, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांना दहा हजार रुपयांचे बक्षीस पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी जाहीर केले आहे.सिनेस्टाइल पाठलागसदर गुन्ह्याताील स्कॉर्पिओ गाडी (क्रमांक एमएच १५ इएक्स ८०६३) ही मालेगाव शहरात काही संशयित घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सिनेस्टाइल पाठलाग करून पाचही संशयितांना गाडीसह पकडले.