शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ झाले लहान, मेळ्याचा आनंद छानगमतीदार

By admin | Updated: August 9, 2014 00:48 IST

स्पर्धांची रंगत : लायन्स क्लबच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन

सिन्नर : अधून मधून बरसणाऱ्या श्रावणसरी, हिरवाईने नटलेला तळ्यातील भैरवनाथ मंदिराचा परिसर, ज्येष्ठ नागरिकांच्या गमतीदार स्पर्धेतून उठणारे हास्यांचे फवारे, टाळ्यांचा कडकडाट अशा वातावरणात ज्येष्ठ नागरिक लहान होऊन स्पर्धांचा छान आनंद घेतानाचे चित्र पहावयास मिळाले. निमित्त येथील लायन्स क्लब व ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ज्येष्ठांच्या आनंद मेळ्याचे. येथील ह.भ.प. त्र्यंबकबाबा भगत यांच्या प्रेरणेने ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक अध्यक्ष मु. शं. गोळेसर यांच्या प्रयत्नांतून व लायन्स क्लबच्या वतीने आयोजित ज्येष्ठ नागरिकांच्या आनंद मेळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी नागपंचमीला येथील तळ्यातीळ भैरवनाथ मंदिरात हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. या धार्मिक कार्यक्रमात भजन, कीर्तनासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा आनंद मेळावा घ्यावा, अशी कल्पना सुचल्याने ज्येष्ठांच्या विविध स्पर्धा आयोजित करण्यासाठी लायन्स क्लबने पुढाकार घेतला आणि आनंद मेळा सुरू झाला. वृद्धापकाळातील थकलेपणाची भावना दूर सारून जीवन आनंदी रहावे, त्यांच्या तणावग्रस्त जीवनाला वेगळे वळण द्यावे यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षाप्रमाणे यंदाही या मेळाव्यात ज्येष्ठांनी लहान होऊन स्पर्धांचा आनंद लुटला. निसर्ग सहल, वनभोजन व स्पर्धा अशा त्रिवेणी संगमातील आनंद मेळ्यात संगीत खुर्ची, चमचा लिंबू, बादलीत चेंढू टाकणे, रिंग टाकणे, तळ्यात - मळ्यात अशा गमतीदार स्पर्धा घेण्यात आला. महिलांसाठी डोळे बांधून चित्रातील नटीच्या कपाळावर टिकली लावणे, एका काडीने मेणबत्त्या पेटविणे, एका मिनिटात जास्तीत जास्त फुगे फुगविणे, लसण सोलने, तांदळातील डाळ निवडणे, बंद केलेल्या कापडी पिशव्यांतील धान्य व मसाल्याचे पदार्थ ओळखणे, सुई- दोरा आदि गमतीदार स्पर्धांमध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला रंगले होते. या स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांना लायन्स क्लबच्या वतीने विविध बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. मु. शं. गोळेसर यांनी प्रास्ताविक केले. ह.भ.प. त्र्यंबकबाबा भगत यांच्या भजनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. ह.भ.प. पुरुषोत्तम गुजराथी, अर्जुन गोजरे, मुरलीधर चव्हाण यांनी भजनास साथ दिली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महिला बचतगट फेडरेशनच्या अध्यक्ष सीमा कोकाटे, नगराध्यक्ष अश्विनी देशमुख, सिमंतीनी कोकाटे, लायन्स क्लबचे अध्यक्ष हेमंत वाजे, कृष्णा भगत, नगरसेवक डॉ.प्रतिभा गारे, राजश्री कपोते, उज्ज्वला खालकर, डॉ. भरत गारे, डॉ. विजय लोहारकर, सुरेश कट्यारे, भूषण क्षत्रिय, राजेंद्र कपोते, मनीष गुजराथी, डॉ. सुजाता लोहारकर, शिल्पा गुजराथी, संगीता कट्यारे आदि उपस्थित होते. यावेळी शेकडो ज्येष्ठ नागरिक व महिलांनी स्पर्धेत सहभाग घेतला व अनेकांनी बक्षिसे मिळविली. रिमझिम पावसातील स्पर्धा उत्तरोत्तर रंगत गेली. ज्येष्ठ नागरिकांनी खेळाचा आनंद लुटला. (वार्ताहर)