शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

जुने नाशिकसाठी जून ठरतोय घात महिना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 00:36 IST

नाशिक : संचारबंदीच्या चौथ्या टप्प्यापासून जुने नाशिक आणि वडाळागाव परिसर कोरोना पूर्वीसारखे सर्व व्यवहार पार पडू लागल्याने जूनच्या पहिल्या दिवसापासूनच कोरोनाबाधितांची संख्या, तसेच मृतांच्या आकड्यांमध्ये वेगाने वाढ होऊ लागली.

नाशिक : संचारबंदीच्या चौथ्या टप्प्यापासून जुने नाशिक आणि वडाळागाव परिसर कोरोना पूर्वीसारखे सर्व व्यवहार पार पडू लागल्याने जूनच्या पहिल्या दिवसापासूनच कोरोनाबाधितांची संख्या, तसेच मृतांच्या आकड्यांमध्ये वेगाने वाढ होऊ लागली. गत पंधरा दिवसांत नाशकात झालेले बाधित दोन-तृतीयांश प्रमाण हे केवळ जुने नाशिक आणि वडाळागाव परिसरातील असल्याने आरोग्य विभागाच्या दृष्टीने ही सर्व सर्वाधिक चिंतेची बाब ठरत आहे. जुने नाशिक भागातील कथडा, गंजमाळ, भद्रकाली, मदिना चौक, दूध बाजार, कोकणी पुरा, कुंभार वाडा, नानावली, मोठा राजवाडा, वडाळानाका, वडाळागाव संपूर्ण परिसरातील घरांपैकी कुठे ना कुठे कोरोनाचे बाधित रुग्ण आढळून आले आहेत. नाशिक शहरातील सर्वाधिक घनदाट वस्ती ही केवळ या परिसरातच प्रामुख्याने आढळून येते. या भागांमध्ये बहुतांश घरे ही एकमेकांना लागून आणि समोरील घरेदेखील अवघ्या काही फुटाच्या अंतरावर असल्याने नाशिक विभागातील कोरोनाबाधितांची सर्वाधिक संख्या याच भागांमधून निर्माण होण्याची भीती आरोग्य विभागासह महापालिका प्रशासनाला वाटत आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये सामान्य ग्रामस्थदेखील कसोशीने नियमांचे पालन करीत असताना महानगरातील नागरिक मात्र कोरोनापूर्वीच्या जगात वावरत असल्यासारखेच महानगरातील प्रत्येक बाजारपेठेत गर्दी करताना दिसून येत आहेत. त्यामुळेच आठवडाभरापासून नाशिकमधील बाधित रुग्णसंख्या तसेच मळ्यात व्यक्तींच्या प्रमाणातही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. नाशिक शहरात झालेले सर्वाधिक मृत्यू हे जून महिन्यात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.--------------------आरोग्य विभाग चिंतित : बाधितांची संख्या अधिक; दाट लोकवस्तीपावसाळ्याला सुरुवात झाल्याने साथीचे आणि दूषित पाण्यासह व्हायरल इन्फेक्शनचे प्रमाण नेहमीप्रमाणेच वाढणार आहे. अशा परिस्थितीत कोरोनाला रोखायचे की साथीच्या आजाराच्या प्रसाराकडे लक्ष द्यायचे, अशी बिकट परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जुने नाशिक आणि वडाळागाव परिसर केवळ हॉटस्पॉट नव्हे तर घातस्पॉट आणि डेथस्पॉट ठरण्याचा खूप मोठा धोका महापालिका आणि आरोग्य प्रशासनाला जाणवू लागला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक