शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जूनचा पंधरवडा कोरडाच; प्रतीक्षा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 00:48 IST

यावर्षी उन्हाची तीव्रता अधिक होती. गतवर्षाच्या तुलनेत यंदा नाशिककरांना प्रचंड प्रमाणात उन्हाचा तडाखा सहन करावा लागला; मात्र पावसाने अद्याप निराशा केली असून, मागील वर्षी १७ जूनपर्यंत १४५ मि.मी.पर्यंत पाऊस झाला होता; यंदा मात्र केवळ ४३ मि.मी. इतक्या पावसाची नोेंद झाली असून, चालू महिन्याचे दोन्ही आठवडे कोरडे गेले.

नाशिक : यावर्षी उन्हाची तीव्रता अधिक होती. गतवर्षाच्या तुलनेत यंदा नाशिककरांना प्रचंड प्रमाणात उन्हाचा तडाखा सहन करावा लागला; मात्र पावसाने अद्याप निराशा केली असून, मागील वर्षी १७ जूनपर्यंत १४५ मि.मी.पर्यंत पाऊस झाला होता; यंदा मात्र केवळ ४३ मि.मी. इतक्या पावसाची नोेंद झाली असून, चालू महिन्याचे दोन्ही आठवडे कोरडे गेले. यावर्षी पावसाच्या हंगामाचा निराशाजनक प्रारंभ झाला आहे.  यावर्षी वरुणराजाचे जोरदार आगमन होईल, असा अंदाज उन्हाच्या तीव्रतेमुळे अनेकांकडून बांधला जात होता; मात्र यंदा मान्सूनपूर्व पावसानेही दडी मारली.मान्सूनचा प्रवेश झाल्याने अपेक्षा वाढल्याअरबी समुद्रात मान्सून पोहचल्यानंतर अचानकपणे थांबला. उत्तर महाराष्टÑात मान्सूनचा प्रवेश दोन दिवसांपूर्वी झाला असला तरी अद्याप पाहिजे तशी दमदार हजेरी पावसाने लावलेली नाही. यामुळे यंदा जूनमध्ये पावसाने नाशिककरांची निराशाच केली असे म्हणणे वावगे ठरू नये. आठवडाभरापेक्षा अधिक दिवस शहर व परिसरात वाऱ्याचा वेग प्रचंड प्रमाणात वाढल्याचे चित्र होते. यामुळे पावसावर त्याचा परिणाम झाल्याचे बोलले जात आहे. यापुढे वरुणराजाची कृपादृष्टी होईल आणि समाधानकारक असा पाऊस शहरासह जिल्ह्यात नाशिककरांना अनुभवयास येईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून केली जात आहे. मान्सूनचा जिल्ह्यात प्रवेश झाल्यामुळे अपेक्षा वाढल्या आहेत.  २०१६ सालीदेखील पावसाने दडी मारली होती. जूनच्या दि. १९ तारखेला पहिल्या पावसाची हजेरी नाशिककरांनी अनुभवली होती. त्यावेळी ८ मि.मी. इतका पाऊस एका दिवसात झाला होता. २०१५मध्ये जून महिन्याच्या पंधरवड्यात पर्जन्यमानाची स्थिती जेमतेम राहिली होती. ३२ मि.मी.पर्यंत पाऊस त्यावेळी पंधरवड्यात झाला होता.  मागील वर्षाचा अपवाद वगळता जूनच पंधरवडा सलग २०१५पासून कोरडाच गेल्याची स्थिती आकडेवाडीवरून स्पष्ट होते. कारण गेल्या वर्षी पंधरवड्यातच पर्जन्यमानाचे प्रमाण जवळपास दीडशे मि.मी.पर्यंत पोहचले होते. यावर्षी अद्याप पावसाने निराशाच केली असून, नाशिककरांना दमदार पावसाची प्रतीक्षा कायमच आहे. अखेरच्या आठवड्यापर्यंत पावसाची सलग हजेरी सुरू होईल, अशी आशा नाशिककर बाळगून आहे.

टॅग्स :Rainपाऊस