शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

वणीत कोविड सेंटरबरोबरमध्ये जम्बो ॲाक्सिजनची लवकरच व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 17:06 IST

वणी : येथील ग्रामपालिका, नागरिक, प्रशासकीय यंत्रणा कोरोना योद्ध्यांचे काम करत असताना दुसरीकडे मात्र वाढत्या कोरोनाबाधितांच्या कोविड सेंटरमधील यंत्रसामुग्रीसाठी ह्यमी वणीकरह्ण या व्हॉट्सॲप ग्रुपने सामाजिक बांधिलकी जपत आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे.

ठळक मुद्दे"मी वणीकर" व्हॉट्सग्रुपच्या माध्यमातून मदतीचा हात

वणी : येथील ग्रामपालिका, नागरिक, प्रशासकीय यंत्रणा कोरोना योद्ध्यांचे काम करत असताना दुसरीकडे मात्र वाढत्या कोरोनाबाधितांच्या कोविड सेंटरमधील यंत्रसामुग्रीसाठी "मी वणीकर" या व्हॉट्सॲप ग्रुपने सामाजिक बांधिलकी जपत आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे.वणी गावातील नागरिक, व्यावसायिक, प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, शेतकरी, कष्टकरी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, उद्योजक, प्राध्यापक व्यापारी वर्ग समाजातील सर्व स्तरातून देणगीचा ओघ सुरू झाला आहे. उपलब्ध झालेल्या निधीची रक्कम नव्याने सुरू होत असलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या कोविड सेंटरमधे जम्बो ऑक्सिजन व्यवस्था अद्ययावत पद्धतीने कार्यान्वित होण्यास मदत होणार आहे .जगदंबा देवी ट्रस्ट व अनेक विविध क्षेत्रांतील देणगीदारांनी सढळ हाताने मानवतेच्या दृष्टिकोनातून संकटाच्या काळात आर्थिक हातभार लावल्याने कोविड सेंटरमधील २५ बेडच्या क्षमतेसाठी दोन ड्युरा ही ऑक्सिजन पुरवठ्याची सेवा कार्यान्वित होणार आहे.समाजोपयोगी कार्यासाठी सतीष जाधव, अंकित दोशी, बंटी सय्यद, तुषार देशमुख, गोविंद थोरात, अमोल भालेराव, गब्बर मनियार, बब्बू शेख व वणीकर ग्रुपच्या सदस्यांनी या सर्व सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या कार्यकर्त्यांनी निधी संकलनासाठी पाठपुरावा करत केवळ दोन दिवसांतच चांगली रक्कम उपलब्ध करून दिली.आयसोलेशन वॉर्ड सुरू करण्याची गरजयेत्या काही दिवसांत नवीन कोविड सेंटरमधे सदरची यंत्रसामुग्री कार्यान्वित होईल व बाधितांवर उपचार करणे सहज सुलभ होईल. दरम्यान, याबरोबर आयसोलेशन वॉर्ड सुरू होणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी सरपंच सुनीता भरसठ, उपसरपंच देवेंद्र गांगुर्डे, माजी उपसरपंच विलास कड, माजी सरपंच मनोज शर्मा यांनी पाठपुरावा करणे अपेक्षित आहे.

यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मदत होईल. शासकीय मुलींचे वसतिगृह यातून आयसोलेशनची व्यवस्था उभी करण्यासाठी इन्सिडंट कमांडर प्रांत अधिकारी संदीप आहेर, तहसीलदार पंकज पवार यांनी अग्रक्रमाने यात लक्ष घातल्यास या समस्येचे निराकारण होणेकामी मदत होईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRural Developmentग्रामीण विकास