शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

न्यायव्यवस्था सत्य शोधण्याची प्रक्रिया : जयंत जायभावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 00:42 IST

सत्य शोधण्याची प्रक्रिया म्हणजे न्यायव्यवस्था आहे, याची जाणीव वकिलांपासून न्यायाधीशांपर्यंत आणि पक्षकारापासून पोलिसांपर्यंत सर्वांनी ठेवणे काळाची गरज आहे. मात्र दुर्दैवाने आज तसे होताना दिसत नाही.

नाशिक : सत्य शोधण्याची प्रक्रिया म्हणजे न्यायव्यवस्था आहे, याची जाणीव वकिलांपासून न्यायाधीशांपर्यंत आणि पक्षकारापासून पोलिसांपर्यंत सर्वांनी ठेवणे काळाची गरज आहे. मात्र दुर्दैवाने आज तसे होताना दिसत नाही. परिणामी न्यायव्यवस्थेचा पाया दिवसेंदिवस कमकुवत होऊ लागला आहे, असे प्रतिपादन महाराष्ट-गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. जयंत जायभावे यांनी केले.संवाद नाशिक या संस्थेच्या वतीने कुसुमाग्रज स्मारकात ‘न्याय मिळण्यास विलंब का होतो’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी जायभावे म्हणाले, यांत्रिक मानसिकतेतून कायद्याची निर्मिती जेव्हा होते तेव्हा समाजाच्या परिस्थितीचे प्रतिबिंब प्रत्येक घटक व पेशामध्ये उमटते. नैतिक दृष्ट्या बघितले तर खटल्यांना विलंब का होतो, तर प्रामाणिकपणा कुठे तरी कमी पडत आहे, हे यामागील निश्चित कारण लक्षात येते. न्यायव्यवस्थेचा पाया कमकुवत होण्यास स्वार्थीवृत्तीने आपल्या पेशामध्ये काम करण्याची प्रवृत्तीच जबाबदार आहे. विलंबाशिवाय न्याय हवा असेल तर प्रत्येकाला ‘सत्यमेव जयते’ या ब्रीदनुसार प्रामाणिक राहून पेशानुसार कर्तव्य पार पाडावे लागेल, असे जायभावे म्हणाले.भारतीय न्यायव्यवस्थेत दिवाणी खटल्याचे वय २६ तर फौजदारी खटल्याचे वय २० वर्ष इतके आहे तर अनुक्रमे परदेशात अवघे ३ व ४ वर्षे इतकेच आहे. यावरून भारतीय न्यायव्यवस्थेची अवस्था लक्षात येते. त्यामुळे सर्वसामान्यांची मानसिकता ‘न्यायालयात जायला नको’, ‘न्यायालयात जायचे कशाला, पुढील तारीख घ्यायला’ अशी होते. वकिलांपासून पोलिसांपर्यंत प्रत्येकाने सत्य शोधण्याच्या प्रक्रि येत आपला सहभाग मानून आपल्या भूमिकेला न्याय दिल्यास न्यायव्यवस्था अधिकाधिक बळकट होण्यास वेळ लागणार नाही.

टॅग्स :Courtन्यायालयadvocateवकिल