नाशिक : गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवून ध्वनिमर्यादेचे उल्लंघन तसेच पोलीस अधिकाºयांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करीत मंडळाच्या कार्यकर्त्यांना चिथावणी देण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात भद्रकाली पोलिसांना शरण आलेले नगरसेवक गजानन शेलार यांना गुरुवारी (दि.२१) न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. सरकारवाडा पोलिसांनी शेलार यांना अटक केली.गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीमध्ये शहीद अब्दुल हमीद चौकात शेलार हे संस्थापक अध्यक्ष असलेल्या दंडे हनुमान मित्रमंडळाच्या वतीने ध्वनिप्रदूषणाची मर्यादा ओलांडून डीजेचा दणदणाट केला. यावेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी त्यांना सदर बाब निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करणे पसंत केले. तसेच मंडळाच्या कार्यकर्त्यांना चिथावणीही देण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. याप्रकरणी त्यांच्यावर भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच धुमाळ पॉइंटजवळ मिरवणूक पोहचल्यानंतर तेथे पुन्हा शेलार यांच्या मंडळाकडून ध्वनिमर्यादा ओलांडली गेली आणि ध्वनिप्रदूषण केले गेले. याप्रकरणी त्यांच्यावर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा न्यायालयाकडे अटकपूर्व जामीन अर्ज शेलार यांनी केला असता न्यायालयाने तो फेटाळला त्यानंतर थेट उच्च न्यायालयात त्यांनी अटक टाळण्यासाठी धाव घेतली होती; मात्र उच्च न्यायालयानेही त्यांचा जामीन अर्ज नामंजूर केला. यानंतर ते फरार होते व पोलीस त्यांच्या मागावर होते. बुधवारी (दि.२०) शेलार हे स्वत:हून भद्रकाली पोलीस ठाण्यात हजर झाले आणि पोलिसांना शरण आले. भद्रकाली पोलिसांनी त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली व सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात त्यांचा पोलिसांना ताबा दिला. पोलिसांनी त्यांना अटक केली असून, शुक्रवारी न्यायालयापुढे हजर केले जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांनी दिली.
भद्रकालीच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; गजानन शेलार यांना सरकारवाडा पोलिसांकडून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 19:41 IST
गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवून ध्वनिमर्यादेचे उल्लंघन तसेच पोलीस अधिकाºयांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करीत मंडळाच्या कार्यकर्त्यांना चिथावणी देण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात भद्रकाली पोलिसांना शरण आलेले नगरसेवक गजानन शेलार यांना गुरुवारी (दि.२१) न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. सरकारवाडा पोलिसांनी शेलार यांना अटक केली.
भद्रकालीच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; गजानन शेलार यांना सरकारवाडा पोलिसांकडून अटक
ठळक मुद्देशेलार हे संस्थापक अध्यक्ष असलेल्या दंडे हनुमान मित्रमंडळाच्या वतीने ध्वनिप्रदूषणाची मर्यादा ओलांडून डीजेचा दणदणाट बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी त्यांना सदर बाब निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करणे पसंत केलेमंडळाच्या कार्यकर्त्यांना चिथावणीही देण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे