शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

न्यायाधीश हवेत गुणवत्तापूर्ण

By admin | Updated: September 8, 2014 00:58 IST

न्यायाधीश हवेत गुणवत्तापूर्ण

नाशिक : न्यायालयांमधील प्रलंबित खटल्यांच्या निपटाऱ्यासाठी न्यायाधीशांची संख्या वाढविणे आवश्यक असून, ही संख्या वाढली तरच न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्यांना न्याय मिळू शकेल़ गुणवत्तापूर्ण न्यायाधीश मिळत नसल्याने न्यायव्यवस्थेतील न्यायाधीशांची अनेक पदे रिक्त आहेत़ यासाठी उच्च न्यायालयाच्या परवानगीने महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलने सुरू केलेल्या ‘ज्युडिशिअल सर्व्हिस अ‍ॅज ए करिअर’ या एक वर्षाच्या ट्रेनिंगमधून गुणवत्तापूर्ण न्यायाधीश तयार होतील़ न्यायाधीश पदावरून समाजाच्या सेवेची संधी मिळते, असे प्रतिपादन देशाचे अ‍ॅडिशनल सॉलिसीटर जनरल अनिल सी़ सिंग यांनी केले़जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये झालेल्या विभागीय ट्रेनिंग प्रोग्रॅमच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते़ पुढे बोलताना सिंग म्हणाले की, न्यायव्यवस्थेची जबाबदारी महत्त्वाची असून, प्रत्येक गोष्टीमध्ये न्यायव्यवस्थेला लक्ष घालावे लागते़ नागरिकांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास असून, समाजाची सेवा करण्याची संधी न्यायाधीशपदावरून मिळते. या संधीचा निवड झालेल्या वकिलांनी लाभ घेण्याचे आवाहनही सिंग यांनी केले़ प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद कारंजकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, शास्त्रीय संगीत शिकणारा जसा नेहमी रियाज करतो त्याचप्रमाणे न्यायाधीश व वकिलांनी कायद्याचा नेहमी अभ्यास करणे गरजेचे आहे़ अ‍ॅड़ जयंत जायभावे यांनी सांगितले की, ढोल वाजविण्यापासून तर फाशीपर्यंतचे सर्व निर्णय न्यायव्यवस्थेला घ्यावे लागत असल्याने गुणवत्तापूर्ण न्यायाधीशांची आवश्यकता आहे़ न्यायाधीश होण्याची इच्छा व त्यादृष्टीने प्रयत्न करणाऱ्या नवोदित वकिलांची निवड करून त्यांना ‘कायद्याचा दृष्टिकोन व तरतुदीं’कडे कसे पाहावे याचे प्रशिक्षण यामधून दिले जाणार आहे़ यावेळी महाराष्ट्र व बार कौन्सिलचे अध्यक्ष अ‍ॅड़ आसिफ कुरेशी, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे उपाध्यक्ष बळवंत जाधव, नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड़ नितीन ठाकरे, जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड़ राजेंद्र घुमरे, माजी जिल्हा सरकारी वकील श्रीधर माने यांनीही आपले मनोगत व्यक्त केले़ आभार अ‍ॅड़ अविनाश भिडे यांनी मानले़ यावेळी नाशिक जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांसह ज्येष्ठ विधिज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते़ (प्रतिनिधी)