शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
3
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
4
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
5
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
6
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
7
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
8
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
9
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
10
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
11
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
12
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
13
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
14
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
15
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
16
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
17
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
18
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
19
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
20
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
Daily Top 2Weekly Top 5

रसिकांना लाभला ‘कलानंद’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 01:29 IST

नृत्यात नुकतीच डॉक्टरेट मिळविलेल्या सुमुखी अथनी यांनी आणि त्यांच्या शिष्यांनी त्यांच्या प्रबंधावर आधारित मातृभुवंदना, धृवपद, सादरा, सावनी व तराणा अशा फारशा प्रचलित नसलेल्या बंदिशींचे सादरीकरण करीत रसिकांची मनमुराद दाद मिळविली. ‘कथक परिक्रमा’ या नृत्य सोहळ्याने रसिकांना नेहमीपेक्षा वेगळ्या कथक नृत्याच्या सादरीकरणाचा आनंद घेता आला.

नाशिक : नृत्यात नुकतीच डॉक्टरेट मिळविलेल्या सुमुखी अथनी यांनी आणि त्यांच्या शिष्यांनी त्यांच्या प्रबंधावर आधारित मातृभुवंदना, धृवपद, सादरा, सावनी व तराणा अशा फारशा प्रचलित नसलेल्या बंदिशींचे सादरीकरण करीत रसिकांची मनमुराद दाद मिळविली. ‘कथक परिक्रमा’ या नृत्य सोहळ्याने रसिकांना नेहमीपेक्षा वेगळ्या कथक नृत्याच्या सादरीकरणाचा आनंद घेता आला.कलानंद कथक नृत्य संस्थेचा वर्धापनदिन आणि संस्थेच्या संचालिका डॉ.सुमुखी अथनी यांना मिळालेल्या डॉक्टरेट पदवीनिमित्त सादर झालेल्या भावदर्शन या नृत्यमय कार्यक्र मास नाशिककर रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यानिमित्त नृत्यातील धृवपद, सादरा, सावनी व तराणा अशा अप्रचलित बंदिशींचे सुंदर प्रदर्शन नाशिककरांना झाले.कालिदास कलामंदिर नाट्यगृहात कलानंद संस्थेचा कथक परिक्र मा हा नृत्यांचा कार्यक्र म पार पडला. देशातील कथक नृत्यांगना मंजिरी देव व श्रीराम देव यांच्या प्रमुख उपस्थितीत कलानंदच्या विद्यार्थिनींनी गणेशगान, तीनताल, एकताल, आलाप आदींची प्रस्तुती केली.या कार्यक्र मात तबलासाथ नितीन पवार व व्यंकटेश कांबळे यांनी केली, तर संवादिनीवर पुष्कराज भागवत व बासरीवर मोहन उपासनी तसेच सिंथेसायझरवर अनिल धुमाळ यांनी संगीतसाथ केली.पहिल्या सत्रात मंजिरी देव व श्रीराम देव यांच्या हस्ते डॉक्टरेट मिळाल्याबद्दल सुमुखी अथनी यांचा सत्कार करण्यात आला. कलानंदच्या संस्थापक संजीवनी कुलकर्णी यांच्या हस्ते मंजिरी देव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंजिरी देव यांनी उपस्थित विद्यार्थिनींना मौलिक मार्गदर्शन केले. उत्तरोत्तर हा कार्यक्र म रंगत गेला व नाशिककरांनी या कथक नृत्याचा आनंद लुटला.

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिक