शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्यात धक्कादायक रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
3
इकडे पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिली; तिकडे 'बेवफा' सोनम युपीत सापडली...
4
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
5
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
6
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
7
आऊट देताच महिला अंपायरवर भडकला अश्निन, रागाच्या भरात पॅडवर मारली बॅट!
8
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
9
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
10
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
11
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
12
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
13
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
14
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
15
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
16
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती
17
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
18
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
19
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
20
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते

मराठा क्र ांती मूक मोर्चात सहभागी व्हा

By admin | Updated: September 23, 2016 00:41 IST

कळवण : सर्वपक्षीय नेत्यांचे आवाहन, तालुक्यात ठिकठिकाणी बैठका, दुचाकीस्वारांची रॅली

कळवण : कोपर्डीच्या मराठा मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी तसेच मराठा समाजाला आरक्षण व अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करावा यासाठी नाशिक जिल्ह्यातील मराठा समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार असून, मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याने मराठा महाकुंभमेळा नाशकात भरणार आहे. मात्र शिस्तीचे दर्शन या मराठा क्रांती मूक मोर्चात दिसेल, असा विश्वास व्यक्त करून कळवण तालुक्यातील मराठा समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मविप्रचे संचालक रवींद्र देवरे, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कारभारी अहेर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे यांनी केले आहे.इतर समाजाप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण देणे गरजेचे असून, या मागणीसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. कोपर्डीसारखी घटना पुन्हा घडू नये, मराठा समाजावर अन्याय होऊ नये यासाठी मराठा समाजाने एकत्रित येणे गरजेचे असल्याचे मत भाजपाचे तालुकाध्यक्ष सुधाकर पगार, शिवसेना तालुकाप्रमुख जितेंद्र वाघ व मनसेचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. नाशिक येथील मोर्चात जास्त संख्येने कळवण तालुक्यातील मराठा समाजबांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा बँकेचे संचालक धनंजय पवार व कळवण नगरपंचायतचे गटनेते कौतिक पगार, पंचायत समिती सदस्य हिरामण पगार यांनी केले आहे. मोर्चात अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माईकवरून येणाऱ्या सूचनांकडेच लक्ष देण्याचेही आवाहन सर्वपक्षीय नेत्यांनी केले आहे.ग्रामसभेत आरक्षणाचा ठराव करण्याचा निर्धार कळवण : मराठा क्र ांती मूक मोर्चा निघणार असून, लाखोंच्या संख्येने मराठा बांधवांचा जनसागर या मोर्चात सहभागी होणार आहे. दि. २ आॅक्टोबरच्या कळवण तालुक्यात होणाऱ्या ग्रामसभेत मराठा समाजाला आरक्षणाचा ठराव करण्याचा निर्धार तालुक्यात झालेल्या बैठकीत करण्यात आला.मोर्चाच्या नियोजनासाठी तालुक्यातील समाज एकवटल्याचे चित्र सोमवारी नाकोडे, खेडगाव, रवळजी, देसराणे, मोकभणगी, ककाणे, बिजोरे, विसापूर, गांगवण, भादवण, पिळकोस, बगडू, भेंडी, बेज येथे बैठका घेऊन नियोजन करण्यात आले असून, मंगळवारी निवाणे, दह्याणे, कुंडाणे, भुसणी, शिरसमणी, ओतूर, कळवण खुर्द, साकोरे, पाळे, वाडी, एकलहरे, मानूर व बुधवारी कनाशी, बेलबारे, गोसराणे, बार्डे, मोहमुख, ओझर, अभोणा, भगुर्डी, दह्याणे, कळमथे येथे झालेल्या नियोजन बैठकीतून दिसून आले.कळवण तालुक्यातील मविप्र, कळवण शिक्षण संस्था, गुरुदत्त शिक्षण संस्था, चिंतामणी शिक्षण संस्था आदि शिक्षण संस्थाचालकांनी मराठा क्र ांती मोर्चाला पाठिंबा देऊन २४ सप्टेंबर रोजी शाळा, महाविद्यालये व इतर शैक्षणिक संकुले बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे़ कृषी, बी-बियाणे विक्रेते यांच्या नाडा संघटनेने पाठिंबा देऊन बंदची हाक दिली आहे.तालुक्यात झालेल्या नियोजन बैठकींना शैलेश पवार, सुधाकर पगार, विकास देशमुख, जितेंद्र वाघ, देवीदास पवार, जितेंद्र पगार, प्रदीप पगार, हेमंत पाटील, गोविंद पगार, अ‍ॅड. संजय पवार, विठोबा बोरसे, घनश्याम पवार, निंबा पगार, शीतलकुमार अहिरे, मनोज शिंदे, विलास रौंदळ, हिरामण पगार, गौरव पगार, प्रवीण रौंदळ, देवरे, विनायक पाटील, गोरख देवरे, बाबाजी वाघ, आबा सूर्यवंशी, समीर मराठे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)