शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण! सुदानमधील अल-फशीरमध्ये पॅरामिलिटरी फोर्सचा हल्ला, ६० हून अधिक लोकांचा मृत्यू
2
अमेरिका पुन्हा एकदा हादरली! मिसिसिपीमध्ये गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १२ जण जखमी
3
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ ऑक्टोबर २०२५; शुभवार्ता समजणार, प्रतिष्ठा वाढणार, धनलाभ होणार
4
चीनवर १०० टक्के  टॅरिफ, ट्रम्प यांनी दिली पुन्हा धमकी; जागतिक बाजारपेठेत पुन्हा मंदीची शक्यता
5
जागतिक अस्थिरतेने गुंतवणूकदार मालामाल! गेल्या चार वर्षांत किती वाढले सोने-चांदीचे भाव? जाणून डोळे फिरतील
6
उद्धवसेनेच्या हंबरडा मोर्चाने छत्रपती संभाजीनगर दणाणले;  शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी १ लाख रुपये द्या - उद्धव ठाकरे
7
ट्रम्प यांचा चीनवर टॅरिफ बॉम्ब; धमकीनंतर कोसळला बाजार; अमेरिकेच्या शेअर बाजारात एप्रिलनंतरची मोठी घसरण
8
तालिबानचा भेदभाव; काँग्रेसची सरकारवर टीका; महिला पत्रकारांना प्रवेश नाकारल्यावरून राजकारण
9
टाटा सन्सचे आयपीओ जारी व्हावे, टाटा ट्रस्टमधील काही विश्वस्तांचे मत; शापुरजी पालनजींकडून लिस्टिंगची पुन्हा मागणी 
10
‘डिजिटल सोने’ घेत नव्या युगात पाऊल टाका 
11
भारताने जगाला स्वतःची कहाणी प्रभावीपणे सांगावी, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचे आवाहन
12
 तालिबानचा पलटवार, अफगाणिस्तान-पाकिस्तान बॉर्डरवर भीषण संघर्ष, अनेक पोस्टवर कब्जा, ५ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू 
13
निवडणुका महायुती की स्वबळावर; निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकांना, मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण
14
भाजपा, JDUने आपल्या जागा मित्रपक्षांना दिल्या, तरी NDAमधील तिढा सुटेना, नाराज मांझी म्हणाले..      
15
गाझा शांतता करारावर स्वाक्षरी करण्यास हमासचा नकार, ट्रम्प यांच्या प्रस्तावाची उडवली खिल्ली
16
भयानक! आधी प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला, मग त्याच चाकूने तिचा गळा चिरला
17
जोपर्यंत न्याय नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाही, IPS पुरन कुमार यांच्या पत्नीची आक्रमक भूमिका
18
ENG W vs SL W : ...अन् श्रीलंकन कॅप्टनवर आली स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर जाण्याची वेळ; जाणून घ्या सविस्तर
19
शेवटच्या चेंडूपर्यंत थरार, नामिबियाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला हरवलं, सामन्यात नेमकं काय घडलं?
20
फ्रान्सच्या राजकारणात मोठी उलथापालथ, सेबॅस्टिन लेकोर्नू एका आठवड्यात दुसऱ्यांदा बनले पंतप्रधान

जिवा-शिवाची बैल जोड...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 01:01 IST

‘दिस चार झाले मन’, ‘अग्गोबाई ढग्गोबाई’, ‘दादला नको गं बाई’ या आणि अशा विविध लोकगीतांचे आणि लोकनृत्याचे सादरीकरण परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे मंगळवारी (दि. १) आर.एम. ग्रुप यांच्यातर्फे आयोजित सांस्कृतिक महोत्सवात करण्यात आले.

नाशिक : ‘दिस चार झाले मन’, ‘अग्गोबाई ढग्गोबाई’, ‘दादला नको गं बाई’ या आणि अशा विविध लोकगीतांचे आणि लोकनृत्याचे सादरीकरण परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे मंगळवारी (दि. १) आर.एम. ग्रुप यांच्यातर्फे आयोजित सांस्कृतिक महोत्सवात करण्यात आले.‘रंग मराठ मोळा : आपली माणसं’ या कार्यक्रमात मंगळवारी विविध लोकनृत्य आणि लोकगीतांचे सादरीकरण कार्यक्रमाची सुरुवात राहुल थाटसिंगार आणि फारूक पिरजादे यांनी गायलेल्या ‘मोरया मोरया’ या गीताने झाली. प्रेक्षकांसाठी गीतांसह नृत्याचीही मेजवानी असलेल्या या कार्यक्रमात विविध लोकनृत्य सादर करताना लहानग्यांनी सादर केलेल्या ‘अग्गोबाई ढग्गोबाई’ या नृत्याने रसिकांची मने जिंकली. उत्तरोत्तर रंगत चाललेल्या या कार्यक्रमात जोगवा या चित्रपटातील ‘जीव रंगला’ या गीताने हा कार्यक्रम विशेष उंचीवर नेऊन ठेवला. या कार्यक्रमात ‘जिवा-शिवाची बैल जोड’, ‘सैराट झालं जी’, ‘चांग भल रं’, ‘खेळ मांडला’, ‘चल गं सखे पंढरीला’ या गीतांबरोबरच पारंपरिक मंगळागौर नृत्य तसेच आम्ही पारधी पारधी, लेजीम, आदिवासी लोकनृत्य, कोळी नृत्य सादर करण्यात आले. पोवाडा, जागरण गोंधळ, संबळ वादन आणि दिंडी नृत्यानेदेखील यावेळी लक्ष वेधले. आर. एम. ग्रुप यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात राहुल थाटसिंगार, फारूक पिरजादे, दीपक लोखंडे, सार्थक खैरनार, अ‍ॅना कांबळे, जितू देवरे, कांचन गोसावी आदींनी आपल्या स्वरांविष्काराने कार्यक्रमात विविध गीते सादर केली तर फारूक पिरजादे, पुष्कराज साळवे, श्रावण बोर्डे (ढोलकी), मनोज गुरव (बासरी), जयेश भालेराव (की बोर्ड) आणि अभिजीत शर्मा (आॅक्टोपॅड) यांनी साथसंगत केली. ‘रंग मराठ मोळा : आपली माणसं’ या कार्यक्रमाचे संगीतकार ध्रुवकुमार तेजाळे तर निर्मिती प्रकाश साळवे यांची होती. गेल्या दोन दिवसांपासून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाची मंगळवारी मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी माजी महापौर अशोक दिवे, आरपीआयचे अध्यक्ष प्रकाश पगारे, चंद्रकांत जोशी, नाट्य परिषद नाशिक शाखेचे सुनील ढगे, चित्रपट महामंडळाचे श्याम लोंढे, तुषार भडांगे, शंकरराव बर्वे, नगरसेवक अ‍ॅड. श्याम बडोदे आणि महानगरपालिकेचे नगरसचिव ए. पी. वाघ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण मटकरी यांनी केले.