लासलगाव : मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळाच्या जिजामाता कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींच्या माध्यमातून मतदार जनजागृती अभिमान राबविण्यात आले.आगामी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी लासलगाव नगरीतून जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थिनींनी मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो तसेच चला सोडू सारे काम, चला करु मतदान घोषणा देऊन परिसरातील नागरिकांना जागृत करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील, सचिव संजय पाटील, उपाध्यक्ष निवृत्ती गायकर संचालक निता पाटील, संस्थेच्या कार्यकारी अधिकारी वैष्णवी पाटील, शंतनू पाटील, मुख्याध्यापक अनिता आहिरे, पर्यवेक्षक सुधा आहेर उपस्थित होते. जनजागृती फेरी यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
जिजामातेच्या विद्यार्थिनींनी काढली मतदान जनजागृती फेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 17:44 IST
लासलगाव : मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळाच्या जिजामाता कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींच्या माध्यमातून मतदार जनजागृती अभिमान राबविण्यात आले.
जिजामातेच्या विद्यार्थिनींनी काढली मतदान जनजागृती फेरी
ठळक मुद्देनिवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी लासलगाव नगरीतून जनजागृती