शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

जिद्दीला सलाम : पोलीस शिपाई झाले पोलीस उपनिरीक्षक पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न झाले साकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 00:38 IST

नाशिक : नाशिक पोलीस दलात शिपाई असलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या स्वप्नांना बळ मिळाले असून, आपल्या जिद्दीच्या जोरावर त्यांनी अधिकारी पदापर्यंत मजल मारली आहे.

ठळक मुद्देखात्यातील मोठ्या पदापर्यंत जाण्याची त्यांची इच्छा सामाजिक कार्य आणि त्यांच्या कलागुणांचा आदर्श

नाशिक : नाशिक पोलीस दलात शिपाई असलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या स्वप्नांना बळ मिळाले असून, आपल्या जिद्दीच्या जोरावर त्यांनी अधिकारी पदापर्यंत मजल मारली आहे. पोलीस उपनिरीक्षक स्पर्धा परीक्षेत त्यांनी यश मिळवत अधिकारी होण्याचा मान मिळविला आहे. पुढील महिन्यात त्यांच्या अधिकारी पदाच्या प्रशिक्षणाला सुरुवात होणार आहे. नाशिक ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस कमांडो राणा परदेशी आणि नाशिक शहर महिला पोलीस शाखेतील सविता गवांदे यांच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. खाकीचे आकर्षण असल्यामुळे राणा प्रतापसिंग परदेशी या तरुणाने बी.कॉम झाल्यानंतर १ जून २०१० रोजी पोलीस भरतीच्या माध्यमातून पोलीस दलात प्रवेश केला. परंतु केवळ पोलीस शिपाई म्हणून सेवा करण्यापेक्षा खात्यातील मोठ्या पदापर्यंत जाण्याची त्यांची इच्छा असल्यामुळे परदेशी यांनी पोलीस दलातील अ‍ॅडव्हान्स प्रशिक्षण फोर्स-१ पोलीस कमांडो म्हणून प्रशिक्षण पूर्ण केले. २०१६ मध्ये एमपीएससीची परीक्षा देऊन ते पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षाही उत्तीर्ण झाले. त्यामुळे आता त्यांच्या डोक्यावर पी-कॅप येणार आहे. वडिलांचे सामाजिक कार्य आणि त्यांच्या कलागुणांचा आदर्श डोळ्यासमोर असल्यामुळे वडिलांप्रमाणेच नाव कमाविण्याची इच्छा राणा यांना होती. मूळ चांदवड तालुक्यातील हट्टी येथील प्रतापसिंग परदेशी यांनी पोटापाण्यासाठी नाशिक गाठले आणि त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. वडिलांनंतर कुटुंबातील सर्व जबाबदारी राणा यांच्यावर आली. त्यातच आई नोकरीला असलेल्या ठिकाणी ब्रेक मिळाला. त्यामुळे राणा यांनी तुटपुंज्या वेतनावर मेडिकलमध्ये काम केले. या काळात मेव्हणे गणेश परदेशी यांची मोलाची साथ लाभली.राणा यांनी मॉलमध्येही काम केले. हे सर्व करीत असताना पोलीस होण्याचे स्वप्न कायम होते. चांगली उंची, देखणा चेहरा, उत्कृष्ट देहबोली असल्यामुळे राणा यांना अनेकांनी मॉडेलिंग करण्याचा सल्ला दिला. मॉडेलिंग करीत असताना नाशिकमधीलच अनेक फॅशन्स शो मध्ये परफॉर्म करण्याची संधी मिळाली. पुढे मुंबई, पुण्यातही काहीकाळ मॉडेलिंग केले. अनेक नामवंत संस्थांसाठी राणा परदेशी यांनी मॉडेलिंग केले आहे. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पोलीस उपनिरीक्षकाची परीक्षा उत्तीर्ण केलेल्या राणा यांना आता प्रतीक्षा आहे ती पी-कॅप परिधान करण्याची.