शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

रु ई येथील जिप शाळा मोडकळीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 20:09 IST

खेडलेझुंगे : रु ई येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सुमारे २६९ विद्यार्थी जीव धोक्यात घालुन शिक्षण घेत आहेत. या शाळेच्या सुमारे आठ खोल्यांची ईमारत ही जुनी असल्याने पुर्णपणे जिर्ण झालेली असुन ती कोणत्याही क्षणी कोसळुन अनर्थ घडु शकतो.

ठळक मुद्देरु ई येथील विद्यार्थी जीव धोक्यात घालुन घेत आहेत शिक्षण

खेडलेझुंगे : रु ई येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सुमारे २६९ विद्यार्थी जीव धोक्यात घालुन शिक्षण घेत आहेत. या शाळेच्या सुमारे आठ खोल्यांची ईमारत ही जुनी असल्याने पुर्णपणे जिर्ण झालेली असुन ती कोणत्याही क्षणी कोसळुन अनर्थ घडु शकतो.सदरच्या शाळेच्या ईमारत निर्लेखन करण्यासाठीचा प्रस्ताव शाळेकडुन मागील २ वर्षापुर्वीच सादर करण्यात आलेला असुनही वरिष्ठ कार्यालयाकडुन अद्याप पावेतो सदरच्या शाळेच्या ईमारतीच्या निर्लेखनाचे आदेश पारित करण्यात आलेले नाहीत. जिर्ण झालेली ईमारत ही कौलारु असुन ती कोणत्याही क्षणी कोसळुन अनर्थ घडु शकतो. याबाबत शाळेकडुन ईमारत उतरविणे कामाचा प्रस्ताव सादर करुन वेळोवेळी पाठपुरावा करुनही वरिष्ठ स्तरावरुन त्याबाबत कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही.सदर शाळेच्या ईमारतीच्या भिंतीला तडे गेलेले आहेत. भिंतीचे दगड पडलेले आहेत. कौल फुटलेले आहेत. सरई चिरलेल्या आहेत. आणि भिंतीला मोठमोठे भोके पडलेले असल्याने तेथे सर्प, विंचु सारखे विषारी श्वापद दिसुन येतात.मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये शाळांचे वर्ग भरवून बालकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रयत्न होत आहे. जि.प. शाळेच्या इमारतींमध्ये शालेय मुले जीव मुठीत धरून शिक्षण घेत आहेत. त्यामुळे या शाळेकडे पालक वर्ग विद्यार्थांना या वर्षापासुन पाठवतील की नाही हा प्रश्न शिक्षकांपुढे उभा राहीलेला आहे. त्यामुळे जिर्ण ईमारती पाडण्याच्या प्रस्तावास तात्काळ मंजुरी मिळणे गरजेचे आहे.दोन वर्षापासुन कुजलेले वासे, मोडकळीस आलेले छप्पर, तुटलेल्या भिंती या अवस्थेत असलेल्या शाळेच्या ईमारतीच्यÞा निर्लेखनाचा प्रस्ताव देवुनही प्रशासनाने या सार्याला वाटाण्याचा अक्षता लावल्या आहेत. धोकादायक इमारतीमुळे यÞा वर्षी शाळा ग्रामपंचायतीच्या मालकीच्या ईमारती किंवा मंदिरात भरवाव्यात की काय असा प्रश्न शिक्षक आणि पालक वर्गापुढे आहे. शाळेचे छप्पर पूर्णत: कुजले असून, वासे कधी कोसळून पडतील हे सांगता येत नाही. सदरच्या प्रस्तवास तात्काळ मंजुरी मिळावी अशी अपेक्षा पालक वर्ग करत आहे.