कळवण : लॉकडाउनमुळे कळवण शहरात अडकून पडलेल्या १०० मजुर कुटुंबाना संभाजीनगर येथील नगरसेवक जयेश पगार मित्रमंडळाकडून मदतीचा हात देण्यात आला आहे. आमदार नितीन पवार यांच्या हस्ते १०० कुटुंबाना धान्य, किराणासह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. कोरोनापासून बचाव करण्यासाठी देश लॉकडाउन करण्यात आल्याने रोजंदारीने काम करून उपजीविका भागवणाऱ्या मजुरांवर सध्या उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. कळवण शहरात या शेकडो परप्रांतीय मजुरांना ठिकठिकाणी राहण्याची व्यवस्था कळवण नगरपंचायतने केली आहे. मजुरांना प्रत्येकी आटा, तूर डाळ, मीठ, गूळ, तांदूळ, तेल व साबण असे साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी नगरसेवक जयेश पगार, कळवण शिक्षण संस्थेचे विश्वस्त भूषण पगार, उपनगराध्यक्ष अतुल पगार, अविनाश पगार,मनोज पगार, सागर पगार,रवि मोहिते, सुनील मोहिते, नितीन पगार, राकेश पगार आदी उपस्थित होते.
जयेश पगार मित्रमंडळाचा मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 22:49 IST