शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

जायकवाडीचा प्रश्न : महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणच बरखास्त करा, खासदार हेमंत गोडसेंची मागणी

By संजय पाठक | Updated: November 22, 2023 10:21 IST

जायकवाडी धरणाला पाणी देण्यास नाशिककरांचा विरोध नाही, मात्र यंदा नाशिक जिल्ह्यात कमी पाऊस झाल्यामुळे पाण्याची मागणी वाढत आहे.

नाशिक - मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिकच्या धरणांमधून पाणी सोडण्याच्या विषयावर मेंढेगिरी समितीची शिफारस आता कालबाह्य झाली असून या समितीच्या शिफारशीनुसारच व्यावहारिक बदल तसेच आकडेवारीची परिपूर्ण माहिती महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे नाही त्यामुळे सदोष कामकाज करणारे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणच बरखास्त करण्याची मागणी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी केली आहे.

जायकवाडी धरणाला पाणी देण्यास नाशिककरांचा विरोध नाही, मात्र यंदा नाशिक जिल्ह्यात कमी पाऊस झाल्यामुळे पाण्याची मागणी वाढत आहे. त्यामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे.  जायकवाडी धरणातील  मृतसाठ्यापैकी सहा टीएमसी पाणी हे याच धरणातून वापरावे अशी नाशिककारांची मागणी आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात काल सुनावणी झाल्यावर गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाच्या पाणी सोडण्याच्या आदेशास स्थगिती देण्यास नकार देण्यात आला त्यामुळे खासदार हेमंत गोडसे यांनी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकारणाची  कार्यपद्धती सदोष असून नाशिक जिल्ह्यातील  धरणातील साठ्याची आकडेवारीबाबत दिशाभूल केली जात असल्यामुळे ते बरखास्त करावे त्याऐवजी निवृत्त न्यायमूर्तींची समिती स्थापन करावी अशी सूचनाही गोडसे यांनी केली आहे.

सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या नाशिक जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य अमृता पवार यांनी आता या प्राधिकरणाच्या विरोधात उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनी उच्च न्यायालयात यापूर्वी याचिका दाखल केली होती त्यावेळी उच्च न्यायालयाने नाशिकच्या वाढत्या लोकसंख्येच्या आधारे अभ्यास तयार करून निर्णय घ्यावा आणि मगच धोरण ठरवावे अशी सूचना केली होती मात्र, या आदेशाची  कार्यवाही झालेली नाही त्यामुळे अवमान दाखल करण्यात येणार असल्याचे अमृता पवार यांनी सांगितले.

टॅग्स :Hemant Godseहेमंत गोडसेJayakwadi Damजायकवाडी धरण