शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

जायखेडा ते श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर दिंडी रवाना

By admin | Updated: January 17, 2017 23:05 IST

परंपरा : वारकऱ्यांची वाढती संख्या

जायखेडा : संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यात्रेनिमित्ताने दर्शनासाठी जायखेडा ते श्रीेक्षेत्र त्र्यंबकेश्वर अशी पायी दिंडी नुकतीच रवाना झाली. हजारो वारकरी भाविकांचा जत्था ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, निवृत्तिनाथ महाराज की जय, गुरुवर्य कृष्णाजी माउली की जय’ असा जयघोष व टाळ-मृदंगाचा गजर करीत दिंडी त्र्यंबककडे मार्गस्थ झाली.या पदयात्रेचे नेतृत्व माउलींच्या कन्या यशोदाअक्का जायखेडकर या करीत आहेत. माउली प्रत्यक्ष नसल्या तरी त्यांच्या पादुकांचे दर्शन घेऊन भाविक कृतार्थ भाव व्यक्त करीत आहेत. ही पदयात्रा जायखेडा, निताने, पिंगळवाडे, केरसाने, कपालेश्वर, निकवेल, कंधाने, कळवण-विसापूर, बेज, ओतूर, नेरूळ, मुळाने, तळेगाव, आम्बेवणी,ङ्क्तदिंडोरी, लखमापूर व पुढे वलखेडमार्गे तळेगाव, पिंपळनारे, म्हसरूळ, पिंपळगाव बहुला, धुळगाव, नाशिक, गणेशगाव, ममईवाडी या विविध गावांमध्ये दरकोस दरमुक्काम करीत गावोगावी कीर्तन, हरिपाठ, प्रवचन, भारु ड, भजनांच्या माध्यमातून समाजप्रबोधन करीत त्र्यंबकेश्वरला पोहचते. या दरम्यान गावागावातून हजारो वारकरी या पदयात्रेत जोडले जात आहेत. त्र्यंबक येथील संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या समाधीवर हे भाविक वारकरी नतमस्तक होणार आहेत. (वार्ताहर)