शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जवान विठ्ठल पगार यांचे हृदयविकाराने निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 01:11 IST

सायखेडा : श्रीरामपूर (बागलवाडी) येथील जवान विठ्ठल रतन पगार (२८) यांचे सोमवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्यावर मंगळवारी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जवान पगार यांच्या पश्चात पत्नी, वडील, आई, भाऊ असा परिवार आहे.

ठळक मुद्देपोस्टिंगच्या ठिकाणी पत्नीला नेण्यासाठी आले होते सुटीवर

सायखेडा : श्रीरामपूर (बागलवाडी) येथील जवान विठ्ठल रतन पगार (२८) यांचे सोमवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्यावर मंगळवारी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जवान पगार यांच्या पश्चात पत्नी, वडील, आई, भाऊ असा परिवार आहे.विठ्ठल अवघ्या २०व्या वर्षी सैन्यात दाखल झाले. पगार यांच्या घरची परिस्थिती गरिबीची आहे. २२ मार्च २०१० रोजी भारतीय सैन्यातील बॉम्बे सॅपरमध्ये ते रुजू झाले होते. उत्तर प्रदेशमधील मेरठ, नागालँड, दिल्ली येथे सेवा बजावल्यानंतर चार दिवसांपूर्वीच त्यांची झांशी येथे बदली झाली होती. बदली झाल्यामुळे चार दिवसांची सुटी घेऊन पत्नी साक्षी यांना घेऊन जाण्यासाठी ते घरी आले. सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास भेंडाळी येथे मित्रांसमवेत गप्पा मारत असताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यांना तत्काळ चांदोरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला.मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सुभेदार टी. पी. लांगे, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, तहसीलदार पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य सुरेश कमानकर, सरपंच गोरख खालकर यांनी पुष्पचक्र अर्पण केले. अंत्यसंस्काराला गोदाकाठ परिसरातील नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.जवान विठ्ठल कुटुंबाप्रमाणे गावाचा अभिमान होते. सुट्टीवर आल्यानंतर गावातील सर्व तरु ण, वृद्धांमध्ये मिळून मिसळून रहाणारा विठ्ठल आमच्यातून कायमचा निघून गेला. मात्र त्याचे कार्य नक्कीच प्रेरणादायी असून ते अनेक तरु णांसाठी प्रेरणा देणारे ठरेल.ज्ञानेश्वर रोडे, ग्रामस्थअश्रूंचा फुटला बांध

गावापासून दोन किलोमीटर अंतरावरून शालेय विद्यार्थ्यांचे लेजीम पथक आणि भजनी मंडळ यांच्या संगीतमय साथीने पगार यांच्या पार्थिवाची मिरवणूक काढण्यात आली. आई शोभा, पत्नी साक्षी, वडील रतन, भाऊ संदीप यांच्यासह उपस्थित नातलगांनी एकच हंबरडा फोडला आणि दबलेल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली. गावातील जवान आणि तरु ण मित्र आपल्याला कायमचा सोडून गेल्याच्या दु:खाची भावना मित्र परिवाराच्या चेहऱ्यावर दिसून येत होती.

विठ्ठल यांचे २०१५ मध्ये सिन्नर तालुक्यातील बारागावपिंप्री येथील साक्षी यांच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर पती सेवेच्या निमित्ताने बाहेर असल्याने चार वर्षानंतर पत्नीला सोबत नेण्यास सैन्य दलाने परवानगी दिली होती. दिल्ली येथील सेवा संपून झाशी येथे पत्नीसह राहाण्यास परवानगी मिळाल्याने पत्नीला घेण्यासाठी ते चार दिवसांपूर्वीच घरी आले होते. मात्र नियतीने घाला घातला.