शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

जऊळके-मुखेड फाटा रस्ताची झाली चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 18:49 IST

पिंपळगाव लेप : जऊळके- मुखेड फाटा रस्ताची अतिशय दयनीय अवस्था झाली असून खड्ड्यांमुळे चाळण झालेल्या रस्त्यामुळे वाहनचालकांसह पादचार्‍यांची मोठी गैरसोय होते आहे.

ठळक मुद्दे गेल्या पाच-सहा वर्षांपासुन जऊळके- मुखेड फाटा या रस्ताचे काम रखडले

पिंपळगाव लेप : जऊळके- मुखेड फाटा रस्ताची अतिशय दयनीय अवस्था झाली असून खड्ड्यांमुळे चाळण झालेल्या रस्त्यामुळे वाहनचालकांसह पादचार्‍यांची मोठी गैरसोय होते आहे.येवला तालुक्यातील पश्चिमभागातील रस्ते अक्षरशः शेवटची घटका मोजत आहे. गेल्या पाच-सहा वर्षांपासुन जऊळके- मुखेड फाटा या रस्ताचे काम रखडले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग याकामाकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरीकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. सातत्याने पडणार्‍या पावसाने रस्त्याची अतिशय दुरावस्था झाल्याने नागरिकांची येण्या- जाण्याची मोठी परवड होत आहे.तालुक्याच्या गावाला जाण्यासाठी नाशिक-औरंगाबाद महामार्गावर जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. या भागातील असे बरेच रस्ते आहेत, की पायी प्रवास करणे सुद्धा अवघड बनले आहे. पाटोदा, पिंपळगाव लेप, जळगाव नेऊर, जऊळके-जळगाव नेऊर, पाटोदा-सातारे आदीसह परिसरातील अनेक रस्ते दुरावस्थेमुळे, रस्ताच्या मध्यभागीच मोठ-मोठे खड्डे पडलेले असल्याने वाहनधारकांना जीव मुठीत धरून साईट पट्याचा आश्रय घ्यावा लागतो. तसेच कंबर व मणका दुखी अशा व्याधींना सामोरे जावे लागत आहे. सदर रस्तांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून केल्या जात असून जऊळके ग्रामस्थांनी तर उपोषणाचा इशारा दिला आहे.परिसरातील नागरिकांना दळणवळण व शेतीमाल नेण्यासाठी चांगल्या रस्त्याची गरज असते. मात्र, जऊळके- मुखेड फाटा रस्त्यात मोठ- मोठे खड्डे झाले असल्याने वाहनचालकांचे मोठे नुकसान होत आहे. तर पादचार्‍यांची मोठी गैरसाय होत आहे. सदर रस्ता काम तातडीने हाती घेण्यात यावी, अन्यथा रस्त्यातील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण आंदोलन केले जाईल.- मच्छिंद्र जाधव, युवा तालुकाध्यक्ष, स्वभिमानी शेतकरी संघटना, जऊळके 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाpwdसार्वजनिक बांधकाम विभाग