शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जोरदार पावसाअभावी कांदा लागवड रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:11 IST

परिसरामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात लाल कांद्याची लागवड करण्यात येते. यंदा मात्र जोरदार पावसाअभावी लागवड खोळंबली असून, शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. निसर्ग कसोटीच घेत असल्याची भावना परिसरातील शेतकºयांमध्ये निर्माण होत आहे. यंदा सुरुवातीला चांगला पाऊस झाला; मात्र पेरण्या झाल्यानंतर पावसाने दांडी मारली.

कौळाणे (गा.) : परिसरामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात लाल कांद्याची लागवड करण्यात येते. यंदा मात्र जोरदार पावसाअभावी लागवड खोळंबली असून, शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. निसर्ग कसोटीच घेत असल्याची भावना परिसरातील शेतकºयांमध्ये निर्माण होत आहे. यंदा सुरुवातीला चांगला पाऊस झाला; मात्र पेरण्या झाल्यानंतर पावसाने दांडी मारली.  मध्यंतरी बाजरी, मका, कपाशी आदी पिकांना दिलासा मिळेल एवढाच पाऊस आला. अद्यापही दमदार पाऊस आला नसल्याने विहिरींना पाणी उतरले नाही. कांद्याची रोपे लागवडीसाठी तयार असून, लागवडीस प्रारंभ करता येत नाही. माळमाथा परिसरातील शेतकºयांचे कांदा पीक प्रमुख मानले जाते. येथील शेतकºयांची आर्थिक गणितं कांद्यावर अवलंबून आहे. येथील शेतकरी कांदा लागवडीसाठी सज्ज झाले असून, जोरदार पावसाअभावी लागवड खोळंबली आहे. माळमाथा परिसरातील कौळाणे, वनपट, अस्ताणे, टिंघरी आदी भाग पर्जन्यछायेचा भाग म्हणून ओळखला जातो. दुष्काळ पाचवीला पूजला असून, जलसिंचनाच्या अपुºया सोयींमुळे या भागातील शेती पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे.माळमाथा परिसरातील शेतकºयांचे प्रमुख पीक म्हणून कांद्याकडे पाहिले जाते. येथील आर्थिक गणित कांदा पिकावर अवलंबून असल्याने येथील शेतकरी कांदालागवडीसाठी सज्ज झाले आहे. मात्र जोरदार पावसाअभावी लागवड खोळंबली आहे. एकीकडे जिल्ह्याच्या बहुतेक भागात चांगला पाऊस पडत असताना या पट्ट्यात पावसाची रिमझिम सुरू आहे. यामुळे कळवण, सटाणा, मालेगाव,देवळा परिसरातील बळीराजा जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.