शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जनस्थान महोत्सवास प्रारंभ

By admin | Updated: June 23, 2017 00:22 IST

‘जनस्थान फेस्टिव्हल’ला गुुरुवारी दिमाखात प्रारंभ झाला. या फेस्टिव्हलची सुरुवात स्वर्गीय तबलावादक प्रमोद भडकमकर यांना ‘मरणोत्तर जनस्थान आयकॉन’ पुरस्कार देऊन झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : ‘जनस्थान’ या कलावंतांच्या व्हॉट््स अ‍ॅप ग्रुपच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘जनस्थान फेस्टिव्हल’ला गुुरुवारी (दि. २२) मोठ्या दिमाखात प्रारंभ झाला. या फेस्टिव्हलची सुरुवात स्वर्गीय तबलावादक प्रमोद भडकमकर यांना ‘मरणोत्तर जनस्थान आयकॉन’ पुरस्कार देऊन झाली.परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे आयोजित या कार्यक्रमात प्रा. डॉ. मो. स. गोसावी आणि पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते भडकमकर यांच्या कुटुंबीयांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवशी प्रमोद भडकमकर यांनी साथसंगत केलेल्या कलावंतांनी गायन, वादन, नृत्यातून स्वर्गीय भडकमकर यांना भावांजली वाहिली. या पुरस्कार प्रदान सोहळ्याप्रसंगी प्रा. डॉ. मो. स. गोसावी यांनी कलाकारांनी आपली कला सादर करताना त्यातून मनस्वी आनंद देणे आवश्यक आहे. तसेच कलेचे दालन अधिकाधिक समृद्ध व्हावे यासाठी जनस्थानसारख्या ग्रुपने पुढे येऊन काम करणे आवश्यक असल्याचे सांगितले. प्रमोद भडकमकर यांच्याबद्दल शोक व्यक्त करताना प्रा. गोसावी यांनी वैयक्तिक मी आणि गोखले एज्युकेशन सोसायटी भडकमकर कुटुंबीय तसेच वैष्णवी भडकमकर यांच्या मागे खंबीरपणे उभे राहणार असल्याचे सांगितले.पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी सांस्कृतिक क्षेत्राची परंपरा अशीच कायम सुरू रहावी यासाठी जनस्थान ग्रुपवर विशेष जबाबदारी असल्याचे सांगतानाच वैष्णवी भडकमकर हिने प्रमोद भडकमकरांचा वारसा पुढे अव्याहत सुरू ठेवण्याचे आवाहन केले. ‘समर्पण’ या संकल्पनेवर आधारित फेस्टिव्हलच्या पहिल्याच दिवशी प्रमोद भडकमकर यांनी साथसंगत केलेल्या कलाकारांनी आपल्या कलेतून भडकमकर यांना भावांजली वाहिली. दरम्यान, फेस्टिव्हलच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि. २३) संगीत आणि अभिनयाच्या क्षेत्रात ज्या कलाकारांनी नाशिकचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवले अशा पं. सुभाष दसककर, विद्या देशपांडे आणि विद्या करंजीकर यांना ‘जनस्थान आयकॉन’ पुरस्काराने सन्नानित करण्यात येणार असून, या कार्यक्रमास सिनेदिग्दर्शक राजदत्त यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. शनिवार (दि. २४) पर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन जनस्थान ग्रुपचे अ‍ॅडमीन अभय ओझरकर यांनी केले आहे. दरम्यान, कार्यक्रमाच्या सुरुवातील प्रमोद भडकमकर यांच्या जीवनावर आधारित ध्वनीचित्रफित दाखविण्यात आली. कार्यक्र माचे सूत्रसंचालन भूषण मटकरी यांनी केले.