शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: आझाद मैदान रिकामे करा; मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांची नोटीस
2
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
3
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
5
तुम्हाला कन्नड येते का? मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर राष्ट्रपतींचे चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या,'प्रत्येकाने आपली भाषा...'
6
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
7
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
8
लेख: सोलापूरकरांची ‘सज्जनशक्ती’, गणेशोत्सवात ‘डीजेमुक्ती’
9
लेख: मतभेद पुसून न टाकता ऐक्य साधता येईल काय?
10
हेमा मालिनी यांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स, १२.५ कोटींची कमाई अन् आता...
11
Mumbai: अखेर मांडवा गेटवे जलवाहतुकीला मुहूर्त मिळाला!
12
Raigad Accident: रायगडमध्ये रिक्षाला अपघात, ब्रेक फेल झाल्याने दिशादर्शकाला धडक, तीन ठार
13
Sudan Landslide: अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप
14
आजचे राशीभविष्य, ०२ सप्टेंबर २०२५: प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, स्वकियांशीच खटके उडतील
15
आजचा अग्रलेख: अमेरिका विरुद्ध सर्व? ट्रम्प यांच्या दादागिरीला उत्तर देण्यासाठी अनेक देश एकत्र
16
विशेष लेख: बाल बलात्कारांनी बांगलादेश हादरला !
17
Mumbai: हायकोर्टाने मराठा आंदोलकांना खडसावले, आज दुपारपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश
18
Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानमध्ये भूकंप, ८०० जणांचा मृत्यू, २५०० हून अधिक जखमी
19
Chhagan Bhujbal: ओबीसीत वाटेकरी नकोत; नाहीतर आम्हीही मुंबईत येऊ, छगन भुजबळांचा इशारा
20
Maratha Reservation: शहर पूर्ववत हवे, पण आंदोलकांचीही चिंता; सुनावणीदरम्यान हायकोर्ट काय म्हणाले?

रामनामाच्या जयघोषात जन्मोत्सव

By admin | Updated: April 5, 2017 00:29 IST

काळाराम मंदिर : ढोल ताशांचा गजर, हजारो भाविक नतमस्तक, महिला भक्तांनी म्हटले पाळणा गीत

नाशिक : सियावर रामचंद्र की जय, जय सीता राम, जय जय सीता राम असा रामनामाचा जयघोष करीत श्री काळाराम मंदिरात रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावर्षाचे उत्सव मानकरी चंदनबुवा पूजाधिकारी यांच्या हस्ते परंपरागत पूजेनंतर रामजन्म होताच भाविकांनी गुलालाची उधळण करून ढोल ताशांच्या गजरात साखर, पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन, महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल आदिंसह संस्थानचे विश्वस्त उपस्थित होते.रामजन्मोत्सव सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. ४) काळाराम मंदिरात दिवसभर उत्साहाच्या आणि भक्तिमय वातावरणात रामनामाचे स्मरण व भजन केले. पहाटे मंगेशबुवा पुजारी यांच्या हस्ते काकड आरती करण्यात आली. त्यानंतर यावर्षाच्या उत्सवाचे मानकरी चंदन पूजाधिकारी यांच्या हस्ते मुख्य महान्यास पूजा करण्यात आली. पूजेच्या साहित्याची पारंपरिक पद्धतीने रामनाम आधाराश्रमापासून मिरवणूक काढून महावस्त्र मंदिरात आणण्यात आले. महावस्त्र व अलंकारांची विधिवत व परंपरागत पद्धतीने पूजा करून प्रभू रामचंद्रांना नवे वस्त्र, अलंकार व सोन्याचा मुकुट चढविण्यात आला. दुपारी बारा वाजता रामजन्मोत्सव साजरा झाला. रामजन्म होताच मंदिराच्या आवारात महिलांनी ‘राम जन्मला गं सखे राम जन्मला’ पाळणागीत गाऊन आनंदोत्सव साजरा केला. जन्मसोहळा पूर्ण होताच मंदिराच्या गाभाऱ्यात जमलेल्या रामभक्तांनी रामनामाचा जयघोष केला. (प्रतिनिधी)