शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जनार्दन स्वामी हेच गुरुमाउली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:20 IST

वैराग्य, शांती, वात्सल्यमूर्ती आणि प्रेमदृष्टी हे प्रमुख गुण सदगुरू जनार्दन स्वामींमध्ये होते. जनार्दन स्वामींनी सर्व भक्तांना सज्ञान करून भक्ती मार्गाला लावले म्हणून जनार्दन स्वामी हेच गुरूमाउली होय, असे प्रतिपादन परमपुज्य माधविगरी महाराज यांनी केले.

्रपंचवटी : वैराग्य, शांती, वात्सल्यमूर्ती आणि प्रेमदृष्टी हे प्रमुख गुण सदगुरू जनार्दन स्वामींमध्ये होते. जनार्दन स्वामींनी सर्व भक्तांना सज्ञान करून भक्ती मार्गाला लावले म्हणून जनार्दन स्वामी हेच गुरूमाउली होय, असे प्रतिपादन परमपुज्य माधविगरी महाराज यांनी केले. जनार्दन स्वामी महाराज यांच्या १०३व्या जयंती महोत्सवनिमित्ताने माधविगरी महाराज यांच्या प्रवचनाचा कार्यक्र म झाला, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, बाबाजींच्या अंगी कायम विनम्रता होती, त्यामुळे बाबांनी कधीच आपला प्रभाव दाखविला नाही. सदगुरू जनार्दन स्वामींचा जन्म नवरात्रीच्या पाचव्या माळेला झाला असल्याने श्री महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वतीचे तत्त्व जनार्दन स्वामींमध्ये असून, गुरुमाउली ही आपल्या सर्वांची माउली असल्याचे माधविगरी महाराज यांनी शेवटी सांगितले. भाऊ पाटील यांनी बाबाजींच्या जीवन चरित्रावर प्रवचन झाले. या जयंती महोत्सवाला परमपूज्य माधवगिरी महाराज, संतोषगिरी महाराज, अण्णासाहेब चव्हाण, मधु जेजूरकर, परशुरामगिरी महाराज, शिवगिरी महाराज, श्रावणगिरी महाराज, जयरामगिरी महाराज, गणेशगिरी महाराज, राघवगिरी महाराज यांच्यासह सर्व विश्वस्त आणि स्वामी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.राष्ट्रसंत श्री जनार्दन स्वामी महाराज यांच्या जयंती महोत्सवानिमित्त औरंगाबाद रोडवरील श्री जनार्दन स्वामी आश्रमात गेल्या तीन दिवसांपासून माधवगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या जयंती महोत्सवाची सांगता करण्यात आली. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या महामृत्युंजय यागाची पूर्णाहुती माधवगिरीजी महाराज आणि संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब चव्हाण यांच्यासह साधूसंत व विश्वस्तांच्या हस्ते करण्यात आली. जनार्दन स्वामी लॉन्स येथे मुख्य जन्मसोहळा उत्साहात करण्यात आला.