शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

माणुकीचा धर्म पाळण्यासाठी नायगाव खोरे सरसावले जनजागृती : अवयवदानाची नोंदणी करीत जीवन फुलविण्याचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 00:47 IST

माणुसकी माझा मूळ धर्म आहे अशी जीवनाचा अर्थ सांगणारी शपथ सिन्नर तालुक्यातील नायगाव खोºयातील ग्रामस्थांनी घेत शासनाच्या अभिनव अभियानात सहभाग नोंदवला. ग्रामपंचायत परिसरात आयोजित महाअवयवदान महोत्सवानिमित्त अनेकांनी अवयवदानाची इच्छा व्यक्त केली. दहा जणांनी नावनोंदणी करून माणुसकीचा धर्म पाळण्याची मुहूर्तमेढ रोवली.

नायगाव : माणुसकी माझा मूळ धर्म आहे अशी जीवनाचा अर्थ सांगणारी शपथ सिन्नर तालुक्यातील नायगाव खोºयातील ग्रामस्थांनी घेत शासनाच्या अभिनव अभियानात सहभाग नोंदवला. ग्रामपंचायत परिसरात आयोजित महाअवयवदान महोत्सवानिमित्त अनेकांनी अवयवदानाची इच्छा व्यक्त केली. दहा जणांनी नावनोंदणी करून माणुसकीचा धर्म पाळण्याची मुहूर्तमेढ रोवली.रक्तदान हे श्रेष्ठदान म्हणून समाजात सर्वश्रुत आहे. मात्र शासनाने अवयवदान अभियानांतर्गत मंगळवारी सर्वच ग्रामपंचायत कार्यालये व आरोग्य विभागाच्या मदतीने ग्रामीण जनतेत अवयवदानाविषयी जनजागृती करीत ग्रामस्थांना शपथ देत प्रबोधन केले. नायगाव व परिसरातील जायगाव, देशवंडी, जोगलटेंभी, सोनगिरी व ब्राह्मणवाडे या गावांमध्ये माणुसकीचा धर्म पाळत अभियान यशस्वी करण्याची शपथ घेतली. ग्रामीण भागात रक्तदान करण्यासही सहसा लोक धजावत नाही, तेथे अवयवदान करणे ही संकल्पना रुजवणे कठीणच. मात्र, ब्राह्मणवाडेचे उपसरपंच सुनील गिते यांनी स्वत: व पत्नी इंदूबाई यांनीही अवयवदानाचा अर्ज भरून आरोग्यसेवक एस. बी. साबळे यांच्याकडे विशेष ग्रामसभेत सुपूर्द केला. यावेळी आरोग्य सेवक साबळे यांनी माणसाचे अवयव माणूस निर्माण करू शकत नाही. त्यामुळे आपल्या अवयवदानाने एखाद्याचे जीवन फुलू शकते, असे सांगत अवयवदानाच्या गैरसमजाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी गोदा युनियनचे माजी संचालक देवराम दामोधर गिते, रमेश तुकाराम गिते, डॉ. शैला साबळे, सुकदेव एकनाथ गिते व ग्रामपंचायत सदस्य सुनील रामराजे आदींनी अवयवदानासाठी नावनोंदणी करून संपूर्ण नायगाव खोºयात आदर्श निर्माण केला आहे. सरपंच अनिता जेजुरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत महाअवयवदान महोत्सवात उपस्थित ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी मनीषा भालेराव यांनी मार्गदर्शन केले.