शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

जमियत उलेमाचा कचेरीवर मोर्चा

By admin | Updated: November 19, 2015 22:03 IST

मालेगाव : फ्रान्समधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध

आझादनगर : फ्रान्स येथील पॅरिसमध्ये रविवारी दहशतवादी हल्ला करून १२९ निरपराधांना जीव गमवावा लागून शेकडो जखमी झाले. या भ्याड हल्ल्याचा निषेध म्हणून जमियत उलमा-ए- हिंद शाखा मालेगावतर्फे ज्येष्ठ मौलाना अब्दुल हमीद अझहरी आणि आमदार आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढण्यात आला. दोन वाजता कार्यकर्ते जमा झाले. दुपारी अडीच वाजता ख्वाजा गरीब नवाज अग्निशमन केंद्र आग्रारोड येथून निषेध मोर्चा निघाला. शिवाजीपुतळा, मोसमपूलमार्गे मोर्चा अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चेकऱ्यांच्या हातात दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त करणारी फलके होती. मोर्चात आदि कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी तहसीलदार किशोर कोळी यांनी निवेदन स्वीकारले. गेल्या रविवारी फ्रान्सच्या पॅरिसमध्ये आयएसआयएस या दहशतवादी संघटनेने अतिरेकी हल्ले करून १२९ लोकांचा बळी घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर जगात सर्वत्र निषेध नोंदवला जात आहे.यावेळी जमियत उलेमाचे जिल्हाध्यक्ष मुफ्ती आसिफ अंजूम यांचे भाषण झाले. ते म्हणाले, संपूर्ण जगातून दहशतवाद संपला पाहिजे. दहशतवादाला कोणताही चेहरा, जात धर्म नसतो. त्याचे समूळ उच्चाटन व्हवे. याचवेळी हाफीज अनिस अजहर, आमदार आसिफ शेख, मौलाना आसिफ शाबान, मौलाना अब्दुल हमीद अजहरी, शफीक अल कासमी यांची भाषणे झाली. तहसीलदार कोळी यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी हदीस हाफीज अ. तव्वाफ, अबु रिजवान, मौलाना अब्दुल हमीद, जमाली, हारुण आशिक अली, कारी एकलाख अहमद, जनता दलाचे मोहंमद मुस्तकीम यांचेसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)