शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

जलकुंभ कोसळून दोघी जागीच ठार

By admin | Updated: October 13, 2015 00:20 IST

दुर्घटना : सावरगावनजीकची घटना

पिंपळगाव बसवंत : कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोघींचा अचानक कोसळलेल्या जलकुंभाखाली दबून जागीच मृत्यू झाल्याची घटना सावरगावनजीक असलेल्या चमकवाडी या आदिवासी वस्तीत सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. जया दगडू सोनवणे (२७), वनिता खंडू लहानगे (१५) अशी मृतांची नावे आहेत.निफाड तालुक्यातील सावरगाव येथील केदराई रस्त्यावर सुमारे एक हजार लोकसंख्या असलेली २०० घरांची चमकवाडी ही कष्टकरी आदिवासींची नागरी वस्ती आहे. येथील नागरिकांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी सावरगाव ग्रामपंचायतीने २६ वर्षांपूर्वी जलकुंभ उभारला होता. परंतु कालांतराने या जलकुंभाची योग्य देखभाल, दुरूस्ती झाली नाही व तो जीर्ण झाला होता. मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असलेल्या या धोकादायक जलकुंभावर जया दगडू सोनवणे (२७), वनिता खंडू लहानगे (१५) आणि मीना संजय मोरे या तिघी जण कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्याचवेळी जलकुंभात पाणी भरले जात होते. पाच हजार क्षमतेचा हा जलकुंभ दुपारी १२ वाजेच्या सुमारास पाण्याने काठोकाठ भरला. पाण्याचा भार न पेलवल्याने जीर्ण झालेला सदर जलकुंभ अचानक कोसळला. कपडे धुण्यात मग्न असलेल्या जया सोनवणे आणि वनिता लहानगे या दोघींच्या अंगावर जलकुंभाचा काही भाग कोसळला. जलकुंभाच्या भिंतीत असलेल्या विटांच्या माऱ्याने वनिता दूरवर दगडावर फेकली गेली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि जागेवरच तिची प्राणज्योत मालवली. जया सोनवणे या सिमेंटच्या भिंतीखाली दबल्या गेल्याने जागीच ठार झाल्या. मात्र मीना मोरे या जलकुंभापासून पाच फूट अंतरावर असल्याने व सावधगिरी बाळगल्याने त्या बचावल्या. वनिताच्या पश्चात आई तर जया सोनवणे यांच्या पश्चात दोन मुली व मुलगा असा परिवार आहे. मृतांच्या नातलगांना भरपाई मिळावी अशी मागणी सावरगावचे सरपंच संजय कुशारे यांनी केली आहे.विशेष म्हणजे, पाण्याच्या फुगवट्याने जीर्ण झालेल्या जलकुंभाच्या चारही भिंती एकाचवेळी जमिनदोस्त झाल्या. भिंती कोसळताच जोरदार आवाज झाला. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघींचे मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढले. मंडल अधिकारी आर. बी. बोरसे, विस्तार अधिकारी गादर यांनी घटनेचा पंचनामा केला. पिंपळगाव बसवंत आरोग्य केंद्रात दोघींच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जि.प.ने अहवाल मागितलानाशिक : पाण्याची टाकी कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोघींचा बळी गेल्यानंतर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने घटनास्थळी दोन अधिकाऱ्यांचे पथक पाठवून घटनेची चौकशी सुरू केली आहे.ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश नंदनवरे यांनी पाण्याची टाकी कोसळून घडलेल्या दुर्घटनेत दोघींचा बळी गेल्याचे समजताच उपअभियंता पेठकर व शाखा अभियंता दिलीप साळुंखे यांना सावरगाव येथे जाऊन चौकशी करण्याचे आदेश दिले. तसेच यासंदर्भात तत्काळ सायंकाळपर्यंत अहवाल सादर करण्याचीही सूचना केली. सावरगावला सद्यस्थितीत गावला पाणीपुरवठा करणारी स्वतंत्र पाण्याची टाकी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून बांधण्यात आली असून, कुरणवस्ती येथे १९८९ साली महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतून सात फूट उंचीचे बैठी सुमारे आठ हजार लिटर्स पाण्याच्या क्षमतेची पाण्याची टाकी उभारण्यात आली होती. या पाण्याच्या टाकीचे बांधकाम संबंधित ग्रामपंचायतीमार्फतच करण्यात आल्याचे प्रकाश नंदनवरे यांनी स्पष्ट केले. तसेच ही पाण्याची टाकी नादुरुस्त किंवा दुरुस्तीविषयक संबंधित ग्रामपंचायतीने कोणताही प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविलेला नाही, असेही त्यांनी सांगितले. संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने ही टाकी धोकेदायक असल्याबाबत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला कळविणे आवश्यक होते. मात्र ग्रामपंचायतीने किंवा ग्रामसेवकाने याबाबत काहीही कल्पना दिलेली नाही. पाण्याच्या दाबामुळे ही पाण्याची टाकी फुटल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे नंदनवरे यांचे म्हणणे आहे. अहवाल आल्यानंतरच यासंदर्भात काही कारवाई करता येईल काय? हा विचार केला जाईल. तूर्तास जिल्हा परिषदेला या घटनेप्रकरणी थेट कोणावरही कारवाई करता येणार नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)