शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक कॉपीबहाद्दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 00:28 IST

विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा संपल्या असून, या परीक्षेत जळगावमध्ये सर्वाधिक विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले आहेत.

नाशिक : विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा संपल्या असून, या परीक्षेत जळगावमध्ये सर्वाधिक विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले आहेत. नाशिक विभागात एकूण २५३ कॉपीची प्रकरणे समोर आली असून, यात एकट्या जळगाव जिल्ह्यात २३८ कॉपीबहाद्दर पकडण्यात आले आहेत. यात दहावी १२८, तर बारावीच्या ११० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तुलनेत नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांची मात्र कॉपीमुक्त परीक्षेच्या दिशेने वाटचाल होत असून, नाशिकमध्ये दहावीचे चार व बारावीचे चार असे एकूण आठ विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले आहेत.नाशिक विभागातील जळगाव जिल्ह्याने दहावी, बारावीच्या परीक्षेत आघाडी घेतली आहे. मात्र ही आघाडी चांगल्या कामासाठी नसून परीक्षेतील गैरप्रकारात असल्याने जिल्ह्यातील शिक्षणव्यवस्था टीकेची लक्ष्य झाली आहे. जळगावमध्ये बारावीच्या पहिल्या पेपरपासूनच सर्वाधिक कॉपी प्रकरणे समोर आली असून, त्यानंतर सलग जळगावचे नाव कॉपी प्रकरणांमुळे चर्चेत राहिले. शिक्षण विभागाचे कॉपीमुक्त परीक्षा राबविण्यासाठी अभियान सुरू असून त्यासाठी विभागस्तरावर २८ भरारी पथके कार्यरत असताना जळगावमध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षेदरम्यान तब्बल २३८ कॉपी प्रकरणे समोर आल्याने सध्या नाशिक विभागात जळगाव जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्था चर्चेचा विषय बनली आहे.जळगावच्या धुळे, नंदुरबार आणि नाशिकमध्ये अत्यल्प गैरप्रकार घडले आहेत. नंदुरबारमध्ये सर्वात कमी म्हणजे दहावीचे केवळ तीन विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले असून, बारावीच्या परीक्षेत एकही गैरप्रकार घडला नाही. तर धुळ्यात दहावीच्या परीक्षेत एकही गैरप्रकार घडला नसून, बारावीच्या परीक्षेत केवळ ४ कॉपी प्रकरणे समोर आली, तर नाशिकमध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षेत प्रत्येकी ४ असे एकूण ८ गैरप्रकार घडले आहेत. २१ फेब्रुवारीपासून सुरू झालेली बारावीची परीक्षा २० मार्चला संपली असून, १ मार्चपासून सुरू झालेली दहावीची परीक्षा शुक्रवारी (दि.२२) संपली आहे.काही ठिकाणी ४ एप्रिलपर्यंत प्रात्यक्षिक परीक्ष सुरू राहणार आहे. मात्र लेखी परीक्षा संपल्याने विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण कमी झाला असून, आता विद्यार्थ्यांना परीक्षेच्या निकालांचे वेध लागले आहे.असे घडले कॉपी प्रकारजिल्हा दहावी बारावीनाशिक ०४ ०४धुळे ०० ०४नंदुरबार ०० ०३जळगाव १२८ ११०एकूण १३५ ११८

टॅग्स :examपरीक्षाNashikनाशिक