शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
3
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
4
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
5
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
6
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
7
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
8
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
9
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
11
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
12
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
13
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
14
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
15
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
16
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
17
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
18
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
19
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी

जलयुक्त शिवार अभियान यशस्वी

By admin | Updated: May 8, 2015 23:50 IST

जलयुक्त शिवार अभियान यशस्वी

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानाची कामे प्रभावीपणे राबवली जात असून, सहा यंत्रणामार्फत कामे राबविली जात आहे. आमदार निर्मला गावित यांनी एकूण १८ गावांची निवड केल्याप्रमाणे देवडोंगरा, तोरंगण, वेळे, देवडोंगरी, भागआहोळ, कळमुस्ते, ब्राह्मणवाडे, गभेशगाव, मुळेवाडी, हिर्डी, खरशित, सामुंडी, टाके दवेगाव, मुरंबी, देवगांव, गावठा व ठाणपाडा या गावांचा समावेश या अभियानात करण्यात आला आहे. पावसाळ्यात पावसाचे पाणी शिवारात जास्तीत जास्त अडविणे, भूगर्भातील पाण्याच्या पातळीत जास्तीत जास्त वाढ करणे, सिंचन क्षेत्रात वाढ करून शेतीसाठी संरक्षित पाणी व पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे, सर्वांना पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध करण्याची शाश्वती ग्रामीण भागातील बंद पडलेल्या पाणी पुरवठा योजनांचे पुनर्जिविकरण करून पाणी पुरवण्यात वाढ करणे, भूजल अधिनियमांची अंमलबजावणी करणे. पाणी साठवण क्षमता निर्माण करणारी नवीन कामे हाती घेणे, अस्तित्वात असलेले व निकामी झालेले जलस्तोत्रांची (बंधारे, गावतलाव, पाझरतलाव, सिमेंट बंधारे यातील पाणी साठवण क्षमता पुनर्स्थापित करणे किंवा वाढविणे. अस्तित्वातील जलस्तोत्रांमधील गाळ लोक सहभागातून जलस्तोत्र पाणीसाठा वाढविणे, वृक्ष लागवडीस प्रोत्साहन देऊन वृक्ष लागवड करणे, शेतीसाठी पाण्याचा कार्यक्षम वापर करणेस प्रोत्साहन देणे, जनजागृती करणे, पाण्याच्या ताळेबंदाबाबत जनतेत जागृती-जाणीव निर्माण करणे असा या अभियानाचा उद्देश आहे. तालुक्यातील विविध सहा यंत्रणांची वेगवेगळी कामे सुरू आहेत. त्यापैकी त्र्यंबक तालुक्यात कार्यकारी अभियंता जि.प.ल.पा. पश्चिम कार्यकारी अभियंता लघुसिंचन (स्थानिक स्तर), उपवन संरक्षक (पश्चिम), वनविकास सर्वेक्षण महामंडळ, कृषी विभाग तर उपमुख्य कार्यकारी अभियंता (ग्रामपंचायत) अशा सहा यंत्रणांतर्फे त्यांच्या विभागाशी निगडित कामे सुरू आहेत. कृषी विभागामार्फत मजगीची व नालाबांधची कामे सुरू आहेत. अन्य यंत्रणांची माहिती नाशिक येथील कार्यालयातून मिळेल असे समजले. तथापि, कार्यकारी अभियंता जि. प. ल. पा. पश्चिम यांची १० कामे सुरू असून सात कामे पूर्ण केली आहे. यासाठी १ कोटी ३५ लक्ष ७८ हजार रुपये खर्च कार्य. अभियंता लघुसिंचन स्थानिक स्तरतर्फे ४ कामे सुरू, २ कामे पूर्ण, उपवन संरक्षक (पश्चिम) ४४ कामे सुरू, ४४ कामे पूर्ण यासाठी १ कोटी ८८ लक्ष ३६ हजार रु. खर्च आला आहे. (वार्ताहर)