शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वच्छता दर्पण’ गुणांकनात जाखोरी ग्रामपंचायत अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 00:35 IST

शासनाच्या स्वच्छता दर्पण मोहिमेत सहभागी झालेल्या नाशिक तालुक्यातील जाखोरी ग्रामपंचायतीने तालुक्यातून प्रथम क्रमांकाचे गुणांकन मिळविले आहे. जिल्ह्यात चौथ्या, तर राज्यात अकराव्या क्रमांकावर ग्रामपंचायतीने स्वच्छतेचा डंका पिटला आहे.

एकलहरे : शासनाच्या स्वच्छता दर्पण मोहिमेत सहभागी झालेल्या नाशिक तालुक्यातील जाखोरी ग्रामपंचायतीने तालुक्यातून प्रथम क्रमांकाचे गुणांकन मिळविले आहे. जिल्ह्यात चौथ्या, तर राज्यात अकराव्या क्रमांकावर ग्रामपंचायतीने स्वच्छतेचा डंका पिटला आहे.नाशिक तालुक्यातील जाखोरी ग्रामपंचायतीने गावाच्या विकासाच्या दृष्टीने ग्रामस्वच्छता, आरोग्य, शिक्षण, जलसंवर्धन, वृक्ष व पर्यावरण संवर्धन या सर्वच बाबतीत काम केले आहे. स्वच्छता दर्पण गुणांकनात १०० गुणांचे तीन विभाग करण्यात आले होते. पैकी ९४ गुण मिळवून जाखोरी ग्रामपंचायतीने नाशिक तालुक्यात प्रथम क्रमांक, जिल्ह्यात चौथा, राज्यात अकरावा, तर देशात ५२वे स्थान पटकावले आहे.जाखोरी गाव २६ जानेवारी २०१६ रोजी हगणदारीमुक्त गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे. वृक्षसंवर्धन व जलसंवर्धनाबाबत माहिती देताना सरपंच सुनीता कळमकर यांनी सांगितले की, वृक्षसंवर्धनासाठी ग्रामपंचायतीमार्फत गट नंबर ५३७ व ५३९ या शासकीय जागेवर वृक्षलागवड करून गावातील लोकसंख्येएवढी झाडे जगविली आहेत. गावातील तरुण आपल्या वाढदिवसानिमित्त वृक्षलागवड करून त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी घेतात. जलसंवर्धनाबाबत लोकसहभागातून व ग्रामपंचायतीच्या सहकार्याने रानमळा नाल्यावर पाझरतलाव तयार करण्यात आला.शेतीसाठी मुबलक पाणी मिळते. गावात साधारणत: ५०० मीटर बंदिस्त भूमिगत गटारी असून, त्याचे पाणी शोषखड्ड्यात सोडले जाते. गावातील घनकचरा कंपोस्ट पिटमध्ये टाकला जातो. यापूर्वी सन २०१८-१९ मध्ये गावाला ‘स्मार्ट ग्राम’ पुरस्काराच्या माध्यमातून १० लाख रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. गावात विचारक्रांती वाचनालय, जय बजरंग पुरुष व्यायामशाळा, राणी लक्ष्मीबाई महिलांची व्यायामशाळा बांधून जिल्ह्यात पहिला बहुमान मिळाला आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान