चांदवड : येथील श्री नेमिनाथ जैन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत यश संपादन केल्याची माहिती प्राचार्य यू. बी. कुलकर्णी यांनी दिली. आठवीचे विद्यार्थी प्रज्वल पेंढारी (विशेष प्रावीण्य), कल्पेश देवरे (तालुक्यात प्रथम), शुभांगी कदम (द्वितीय), अनुष्का ठाकरे (द्वितीय), संगम चव्हाण (तृतीय), उत्कर्षा पाटील (उत्तेजनार्थ), समृद्धी साठे (उत्तेजनार्थ, चेतना अहेर (उत्तेजनार्र्थ). नववीतील राहुल कोकणे (जिल्ह्यात प्रथम), ऋषीकेश ठाकरे (जिल्ह्यात पाचवा), अमित निकम (विशेष प्रावीण्य), स्मिता येवला (तालुक्यात प्रथम), प्रतीक आवारे (प्रथम), शुभम सोनवणे (द्वितीय ), अक्षया ठाकरे (तृतीय), अपूर्व ठाकरे (चौथा), दहावीतील सई निकम (प्रथम), किमया जैन (द्वितीय), मयूर पाटील (तृतीय), मयूरी गांगुर्डे (उत्तेजनार्थ) यांनी यश संपादन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपाध्यक्ष अजितभाऊ सुराणा, मानद सचिव जवाहरलाल आबड, समन्वयक शांतीलाल अलीझाड, वर्धमान लुंकड व पदाधिकारी यांच्या समवेत सत्कार करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य संदीप समदडिया, पर्यवेक्षक ताराचंद सोनी, ए. सी. खैरनार, जी. डी. खैरनार व शिक्षक उपस्थित होते. (वार्ताहर)’नाशिक : नाशिकरोड पोलीस ठाण्यात शासकीय मुद्देमालामध्ये साडेनऊ लाखांचा अपहार करणारे मुद्देमाल कारकून ईश्वर धनलाल दुबे यांना पोलीस खात्यातून निलंबित करण्यात आल्याचे आदेश पोलीस उपआयुक्त संदीप दिवाण यांनी काढले आहेत.
प्रज्ञाशोध परीक्षेत जैन विद्यालयाच सुयश
By admin | Updated: July 18, 2014 00:34 IST