शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

जेलरोड मोरे मळा येथील बाप-लेक जागीच ठार

By admin | Updated: October 6, 2016 00:43 IST

टँकर-कार यांच्यात अपघात

नाशिक : राजूर फाटा येथे स्विफ्ट कारने गॅस टँकरला पाठीमागून दिलेल्या धडकेत जेलरोड परिसरातील बाप-लेक संपत कारभारी खांगळ (५५) व त्यांचा मुलगा जगदीश संपत खांगळ (२८, रा़ जेलरोड, बालाजीनगर, मोरे मळा, नाशिकरोड) हे जागीच ठार झाल्याची बुधवारी घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मूळचे लासलगाव तालुक्यातील रहिवासी असलेले संपत खांगळ हे मुंबईतील एमटीएनएलमध्ये कामास आहे़ मुंबईला कामानिमित्त आलेला त्यांचा मुलगा जगदीशसोबत ते स्विफ्ट डिझायर कारने (एमएच २०, बीयू ७८३६) मुंबईहून नाशिकला येत होते़ दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास मुंबई महामार्गावरील राजूर फाट्याजवळील गांधीनगर पेट्रोलपंपाजवळ गॅस टँकरला स्विफ्ट कारने पाठीमागून जोरात धडक दिली़ या भीषण दुर्घटनेत संपत व जगदीश खांगळ या बाप-लेकाच्या डोके, चेहरा, छातीस जबर मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले़ त्यांना तेथील स्थानिक नागरिकांनी उपचारासाठी नरेंद्राचार्य महाराज अ‍ॅम्ब्युलन्समधून जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले़ मयत संपत खांगळ यांचा एक मुलगा नौसेनेत असून, त्यांच्या आजारी पत्नीस एक दिवसापूर्वीच दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले होते़ दरम्यान, या अपघातप्रकरणी रात्री उशिरापर्यंत वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़ या दुर्दैवी घटनेत बाप-लेकांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)