शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

आधाराश्रमाच्या ‘जाई-जुई’ अमेरिकेत फुलणार

By admin | Updated: May 30, 2017 00:55 IST

नाशिक : निष्ठूर स्त्रीने अवघ्या बारा दिवसांच्या जुळ्या स्त्री जातीच्या अर्भकांना शहरातील एका रुग्णालयाबाहेर सोडून पोबारा केल्याची घटना गतवर्षी जुलैमध्ये उघडकीस आली होती

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : संतती सुख लाभले मात्र त्या निष्ठूर स्त्रीने अवघ्या बारा दिवसांच्या जुळ्या स्त्री जातीच्या अर्भकांना शहरातील एका रुग्णालयाबाहेर सोडून पोबारा केल्याची घटना गतवर्षी जुलैमध्ये उघडकीस आली होती. नऊ महिन्यांपासून या निरागस जुळ्या मुलींचे आधाराश्रमात जाई व जुई नाव ठेवून संगोपन सुरू होते. त्यांना न्यूयॉर्क शहरातील ख्रिस्तोफर व तारा हिटगर या दाम्पत्याचे पालकत्व लाभले आहे.स्वेच्छेने असो किंवा सासरच्या दबावाखाली येऊन अथवा इतर कारणाने त्या अज्ञात स्त्रीने जरी पोटच्या गोळ्यांना वाऱ्यावर सोडून दिले तरी नियतीने मात्र अवघ्या नऊ महिन्यांतच नाशिकच्या आधाराश्रमात वाढणाऱ्या ‘जाई-जुई’ या जुळ्या बहिणींच्या झोळीत थेट अमेरिकेचे पालकत्व टाकले. जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा ‘जिसका कोई नहीं उसका तो खुदा हैं यारो...’ या गीताच्या ओळी सहज ओठावर येतात. आधाराश्रमाला आपला लळा लावणाऱ्या जाई-जुई मंगळवारी (दि.३०) अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहराच्या दिशेने रवाना झाल्या.