शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘जाणता वाघोबा’  आता सिन्नरमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 00:40 IST

जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील गोदाकाठाच्या शिवारातील पंचक्रोशीत ‘जाणता वाघोबा’ अभियान यशस्वी झाल्यानंतर त्याच धर्तीवर नाशिक पश्चिम वनविभागाने वाइल्ड लाईफ कॉन्झर्वेशन सोसायटीच्या सहकार्याने सिन्नर वनपरिक्षेत्रात बिबट्याच्या जीवशास्त्राबाबत माहिती व जनसामान्यांमध्ये जागृती करणारे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

नाशिक : जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील गोदाकाठाच्या शिवारातील पंचक्रोशीत ‘जाणता वाघोबा’ अभियान यशस्वी झाल्यानंतर त्याच धर्तीवर नाशिक पश्चिम वनविभागाने वाइल्ड लाईफ कॉन्झर्वेशन सोसायटीच्या सहकार्याने सिन्नर वनपरिक्षेत्रात बिबट्याच्या जीवशास्त्राबाबत माहिती व जनसामान्यांमध्ये जागृती करणारे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.  बिबट्याच्या हल्ल्यापासून मानव-पाळीव प्राण्यांचे संरक्षण कसे करावे? बिबट्याचे जीवशास्त्र कसे आहे? पिंजरा लावून खरोखरच बिबट्याची समस्या सुटते की वाढते? अशा विविध प्रश्नांच्या माध्यमातून बिबट्याविषयीची शास्त्रीय माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी जुन्नर, संगमनेरनंतर निफाडमध्ये त्याच धर्तीवर वर्षभरापूर्वी वनविभाग व सोसायटीच्या वतीने ‘जाणता वाघोबा’ हे अभियान राबविले गेले. याअंतर्गत शाळा-महाविद्यालयांमधून काही होतकरू हौशी विद्यार्थ्यांची ‘बिबट्यादूत’ म्हणून निवडदेखील करण्यात आली. या अभियानाला सायखेडा ते तारुखेडलेपर्यंत सर्वच गावांमधून चांगला प्रतिसाद  लाभला. बिबट्याविषयीचे भय जनसामान्यांमधून कमी होण्यास मदत झाली. तसेच बिबट्याविषयीचे अज्ञानही दूर झाले आणि शास्त्रीय माहितीमुळे ज्ञानात भर पडली. संरक्षणाच्या उपाययोजनांची माहितीही गोदाकाठावरील गावकऱ्यांना झाली. हे अभियान मानव-बिबट्या संघर्ष कमी करण्यासाठी पूरक ठरणारे असल्याचे लक्षात आल्यानंतर पूर्व वनविभागाप्रमाणेच नाशिक पश्चिम वनविभागानेही सिन्नर वनपरिक्षेत्राच्या हद्दीतील गावागावांमध्ये ‘जाणता वाघोबा’ अभियान राबविण्यासाठी हालचाली  सुरू केल्या आहेत. लवकरच या अभियानाचा शुभारंभ सिन्नरमध्ये होण्याची चिन्हे आहेत.बिबट्या-मानव संघर्ष टाळण्याचा प्रयत्नसिन्नर वनपरिक्षेत्रात बिबट्याचा अधिवास आढळून येतो. अनेकदा बिबट्या-मानव संघर्ष निर्माण होतो. बिबट्यासारख्या मार्जार कुळातील व नैसर्गिक अन्नसाखळीमधील महत्त्वाच्या वन्यप्राण्यांपैकी एक असलेल्या वन्यजीवाविषयीचे अज्ञान दूर करण्याच्या हेतूने वनविभागाकडून हे अभियान हाती घेण्यात येणार आहे.४अभियानाचा सकारात्मक प्रतिसाद जनसामान्यांवर होत असल्याची खात्री वनविभागाला पटली आहे. बिबट्याचे जीवशास्त्र लक्षात आल्यानंतर त्याची भीती कमी होण्यास मदत होते, अशी माहिती सोसायटीचे स्वयंसेवक व अभियानाचे समन्वयक मृणाल घोसाळकर यांनी दिली.सिन्नर वनपरिक्षेत्रामध्येही मानव-बिबट्याचा संघर्ष वारंवार विविध घटनांमधून पुढे येतो. शेतकºयांचे पशुधन तसेच शेतमजूर व रहिवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ‘जाणता वाघोबा’ उपक्रम राबविण्याचे विचाराधिन आहे. याबाबत वाइल्ड लाइफ कॉन्झर्वेशन सोसायटीच्या समन्वयकांसोबत चर्चाही झाली आहे. लवकरच या अभियानाला सुरुवात करू. नाशिक पूर्व वनविभागाकडून निफाडमध्ये हे अभियान यशस्वीरीत्या राबविले गेले आहे. त्या धर्तीवर सिन्नरमध्ये प्रयोग करण्याचा मानस आहे.  - टी.ब्यूला एलील मती,  उपवनसंरक्षक, नाशिक पश्चिम

टॅग्स :leopardबिबट्या