शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
3
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
4
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
5
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
6
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
7
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
8
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
9
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
10
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
11
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
12
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
13
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
14
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
15
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
16
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
17
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
18
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
19
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
20
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव

सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची लढत

By admin | Updated: January 13, 2017 00:30 IST

चढाओढ : माजी आमदारांची भूमिका ठरणार निर्णायक

 सचिन कोठावदे ताहाराबादताहाराबाद जिल्हा परिषद गटासह ताहाराबाद व अंतापूर पंचायत समिती गण अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाल्याने विद्यमान सदस्यांसह अनेक इच्छुकांच्या अपेक्षांवर पाणी फिरले असून, गटात काँग्रेस, तर पंचायत समिती गणात भाजपा व राष्ट्रवादीचे सदस्य निवडून गेले होते. माजी आमदार दिलीप बोरसे व माजी आमदार उमाजी बोरसे यांचाही या गटावर चांगला प्रभाव आहे. यावेळी त्यांची भूमिका निर्णायक राहील.संमिश्र समतोल साधणारा गट व दोन्ही पंचायत समिती गण म्हणून उल्लेख करावा लागेल. कारण सर्वपक्षीय वरिष्ठ पदाधिकारी या भागातील असल्याने सर्वपक्षीय ताकदीचा गट म्हणून तालुक्यात या गटाची ओळख आहे.हा गट नव्याने अस्तित्वात आल्यानंतर झालेल्या निवडणुकीत गटासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण झाले. भाजपाकडून सीमा किशोर भामरे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून चित्रा ज्ञानेश्वर नंदन, तर काँग्रेसकडून (कै.) सुशीला प्रभाकर सोनवणे यांच्यात झालेल्या अटीतटीच्या लढतीत भाजपाच्या सीमा भामरे यांनी विजय मिळविला. ताहाराबाद पंचायत समिती गणात अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या आरक्षणावर भाजपाचे नारायण माळी व काँग्रेसचे यशवंत पवार यांच्यात सरळ लढत झाली. यात पवार यांचा निसटता पराभव होऊन माळी यांनी विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेसचे माळी तिसऱ्या स्थानावर होते. अंतापूर पंचायत समिती गणात काँग्रेस- भाजपात सरळ लढत होऊन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते (कै.) श्यामकांत पवार यांनी एकतर्फी विजय मिळवत भाजपाचे अभय पवार यांचा पराभव केला होता. दरम्यान, श्यामकांत पवार यांचे अकाली निधन झाल्याने या गणात पोटनिवडणूक लागली होती. या पोटनिवडणुकीत कै. पवार यांच्या घरातील उमेदवार निवडणूक रिंगणात उभा करून त्यास बिनविरोध निवडून देण्याचा सर्वपक्षीय नेत्यांचा प्रयत्न झाला. मात्र ऐनवेळी भाजपाने श्यामकांत पवार यांचे निकटवर्तीय समजले जाणारे यशवंत अहिरे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकून बिनविरोध निवडीची गणिते बदलली. त्यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते (कै.) नानाभाऊ शिंदे यांना पक्षाने उमेदवारी दिली; मात्र निवडणुकीत भाजपाचे अहिरे यांचा विजय झाला होता.यंदाच्या निवडणुकीत ताहाराबाद जिल्हा परिषद गट अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाला असल्याने विद्यमान सदस्य डॉ. प्रशांत सोनवणे यांच्यासह अनेक इच्छुकांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे. गेल्या निवडणुकीत डॉ. सोनवणे यांच्या माध्यमातून काँग्रेसने भाजपाच्या ताब्यातून गट आपल्याकडे खेचला होता. या निवडणुकीत इच्छुकांची संख्या तशी जेमतेम असली, तरी सर्व बाजूंनी सक्षम उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवण्यासाठी सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न चालला आहे. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष साखरचंद कांकरिया, भाजपाचे तालुकाध्यक्ष संजय भामरे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष सुभाष नंदन हे ताहाराबाद गावात वास्तव्यास आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र भामरे हेही तांदूळवाडी या पाच किमी अंतरावरील गावात वास्तव्यास आहेत. चौघे प्रमुख पदाधिकारी ताहाराबाद गटाशी संलग्न असल्याने चारही पक्षांसाठी निवडणूक प्रतिष्ठेची होणार आहे. यापूर्वी गटातून माजी आमदार उमाजी बोरसे, साखरचंद कांकरिया यांनी या गटाचे प्रतिनिधित्व केले आहे.