शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचावर अविश्वास आणणे यापुढे कठीण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 00:28 IST

ग्रामपंचायतींच्या सरपंचाची थेट जनतेतून निवड करण्याचा भाजपा सरकारचा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित असल्याची टीका विरोधकांकडून केली जात असताना यापुढे निवडल्या जाणाºया सरपंचांवर कोणत्याही परिस्थितीत अविश्वास ठराव येणार नाही आणि आलाच तर तो मंजूरच होणार नाही, अशी काटेकोर कायदेशीर तरतूद सरकारने यासंदर्भात काढलेल्या अध्यादेशात केली आहे.

नाशिक : ग्रामपंचायतींच्या सरपंचाची थेट जनतेतून निवड करण्याचा भाजपा सरकारचा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित असल्याची टीका विरोधकांकडून केली जात असताना यापुढे निवडल्या जाणाºया सरपंचांवर कोणत्याही परिस्थितीत अविश्वास ठराव येणार नाही आणि आलाच तर तो मंजूरच होणार नाही, अशी काटेकोर कायदेशीर तरतूद सरकारने यासंदर्भात काढलेल्या अध्यादेशात केली आहे.राज्यात सप्टेंबर व आॅक्टोबरमध्ये होणाºया ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, ग्रामपंचायत सदस्यांबरोबरच सरपंचाची निवडदेखील थेट जनतेतून करण्यात येणार आहे. त्यामुळे थेट नगराध्यक्षांप्रमाणे थेट सरपंचाची निवड जनतेतून करून त्याची खुर्ची अधिकाधिक बळकट राहण्यासाठी त्याचबरोबर गावपातळीवरील गटातटाच्या राजकारणापासून त्याला अलिप्त ठेवण्याची कायदेशीर तरतूद सरकारने केली आहे. थेट सरपंचपदाची निवडणूक लढविणाºया उमेदवाराला राजकीय पक्षांचे चिन्ह मिळणार नसले तरी, राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या मुक्त चिन्हातून कोणतेही एक निवडणूक चिन्ह सरपंचपदाच्या उमेदवाराला मिळू शकते. जे चिन्ह सरपंचपदासाठी देण्यात आले ते चिन्ह अन्य उमेदवाराला अथवा ग्रामपंचायत सदस्यपदाची निवडणूक लढविणाºयाला दिले जाणार नाही, असे आयोगाने जाहीर केले आहे. सरपंचपदाच्या उमेदवारासाठी शासनाने पहिल्यांदाच शैक्षणिक पात्रतेची अट घातली आहे. किमान सातवी पास किंवा सातवी इयत्तेशी समतुल्य शैक्षणिक प्रमाणपत्र त्याच्याकडे असणे बंधनकारक आहे. सरपंचपदासाठी फिक्कट निळ्या रंगाची मतपत्रिका असणार आहे. थेट जनतेतून सरपंच निवडला गेला नाही तर या पदासाठी पुन्हा निवडणूक घेण्यात येईल व तरीही सरपंचाची निवड न झाल्यास ग्रामपंचायत सदस्यांमधून सरपंचाची निवड करण्याची तरतूद शासनाने केली आहे. सरपंच निवडणुकीत समसमान मते पडली तर मात्र चिठ्ठ्या टाकून विजेता ठरविण्यात येणार आहे.