शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

जनरल क्लॉज अ‍ॅक्टचा वापर शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 00:41 IST

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरुद्ध महापालिकेतील लोकप्रतिनिधींनी अविश्वास ठराव मांडला आहे़ कायदेशीर दृष्टिकोनातून पाहता महापालिका आयुक्तांची नेमणुकीची तरतूद ही महाराष्ट्र मुन्सिपल कार्पोरेशन अ‍ॅक्ट १९४९ मधील कलम ३६ मध्ये आहे़ कलम ३६ (१) नुसार राज्य शासन महापालिका आयुक्तांची नेमणूक करेल़

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरुद्ध महापालिकेतील लोकप्रतिनिधींनी अविश्वास ठराव मांडला आहे़ कायदेशीर दृष्टिकोनातून पाहता महापालिका आयुक्तांची नेमणुकीची तरतूद ही महाराष्ट्र मुन्सिपल कार्पोरेशन अ‍ॅक्ट १९४९ मधील कलम ३६ मध्ये आहे़ कलम ३६ (१) नुसार राज्य शासन महापालिका आयुक्तांची नेमणूक करेल़  कलम ३६ (२) नुसार राज्य शासनास प्रथम तीन वर्षांसाठी आयुक्तांची नेमणूक करेल, तसेच राज्य शासनास आयुक्तांना मुदतवाढही देता येईल मात्र तिचा कालावधीही तीन वर्षांचा असेल़ तर कलम ३६ (३) नुसार अ) आयुक्त पूर्वीच्या सेवेचा हक्क ठेवून आला असेल तर राज्य शासन त्यास परत बोलावू शकते़ ब) आयुक्त अकार्यक्षम असेल, गैरवर्तणूक करीत असेल किंवा कर्तव्याकडे दुर्लक्ष करीत असेल तर त्यास राज्य शासन परत बोलावू शकते़ क) महापालिकेच्या महासभेने आयुक्तांविरोधात अविश्वास ठराव दाखल केला व सर्व सभासदांपैकी पाच अष्टमांस सभासदांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले तर राज्य शासन ताबडतोब आयुक्तांना पदावरून दूर करेल अशा तरतुदी आहेत़  या कायद्यामध्ये आयुक्तांविरोधात अविश्वास ठराव मांडल्यानंतर तो मागे घेण्याची कोणतीही तरतूद नाही तर केवळ अविश्वास ठराव मंजूर किंवा नामंजूर असे दोनच पर्याय आहेत़ मात्र, असे असले तरी या अविश्वास ठरावाच्या प्रश्नाबाबत ‘जनरल क्लॉजेस अ‍ॅक्ट’चा वापर करता येऊ शकतो़ ज्या कायद्यामध्ये पदावरील व्यक्तीला काढण्याची तरतूद असते मात्र परत घेण्याची तरतूद नसते त्यावेळी जनरल क्लाजेस अ‍ॅक्टचा आधार घेतला जातो़ या अ‍ॅक्टमधील तरतुदीचा आधार घेऊन ज्यांनी अविश्वासाचा ठराव मांडला आहे ते परत घेऊ शकतात वा त्यामध्ये दुरुस्ती करू शकतात, असा अर्थ काढला जातो़ नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरील अविश्वास ठरावाच्या निर्णयाबाबत या अ‍ॅक्टचा म्हटले तर आधार घेताही येऊ शकतो व नाहीही़ अर्थातच, या अ‍ॅक्टचा वापर करणे वा न करणे हे लोकप्रतिनिधींच्या मानसिकतेवर अवलंबून आहे़- अ‍ॅड़ श्रीधर माने ,  माजी जिल्हा सरकारी वकील

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाadvocateवकिल