शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

वेतन कपात होणे शक्य नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:54 IST

ऐन दिवाळीत वेतनवाढीच्या मागणीसाठी संप करणाºया एस.टी. कामगारांचे ३६ दिवसांचे वेतन कपात करण्याचे परिपत्रक राज्य परिवहन महामंडळाने काढल्याने या निर्णयाविषयी कर्मचाºयांमध्ये तीव्र नाराजी आहे. सदर निर्णय हाच मुळी बेकायदेशीर असल्याने अशाप्रकारचा निर्णय महामंडळ घेऊच शकत नसल्याचा दावा एस.टी. कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष विजय पवार यांनी केला असून, नाशिक विभागातील एकाही कर्मचाºयाचे वेतन कापू दिले जाणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे.

नाशिक : ऐन दिवाळीत वेतनवाढीच्या मागणीसाठी संप करणाºया एस.टी. कामगारांचे ३६ दिवसांचे वेतन कपात करण्याचे परिपत्रक राज्य परिवहन महामंडळाने काढल्याने या निर्णयाविषयी कर्मचाºयांमध्ये तीव्र नाराजी आहे. सदर निर्णय हाच मुळी बेकायदेशीर असल्याने अशाप्रकारचा निर्णय महामंडळ घेऊच शकत नसल्याचा दावा एस.टी. कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष विजय पवार यांनी केला असून, नाशिक विभागातील एकाही कर्मचाºयाचे वेतन कापू दिले जाणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे.  सातव्या वेतन आयोगाप्रमाणे कर्मचाºयांना वेतन मिळावे, यासाठी एस.टी. कामगार संघटना आणि इंटकसह अन्य काही संघटनांनी बेमुदत संप पुकारला होता. ऐन दिवाळीत संप पुकारण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झाले होते. त्यामुळे परिवहनमंत्र्यांनी खासगी वाहतूकदारांना प्रवासी वाहतूक करण्याचा तात्पुरता परवाना मान्य केला होता. तसेच मंत्र्यांनी संपावरील कर्मचाºयांना बडतर्फ करण्याचा इशाराही दिला होता. त्यांच्या या निर्णयामुळे कामगार संघटनेने अभिनव आंदोलन करून सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदविला होता. तब्बल पाच दिवस हा संप सुरू होता. अखेर न्यायालयाने संप बेकायदेशीर  ठरविल्यानंतर आणि समिती गठित करण्याचा निर्णय दिल्याने कर्मचारी कामावर परतले होते.मात्र आता परिवहन विभागाने संपावरील कर्मचाºयांचा ३६ दिवसांचा पगार टप्प्याटप्प्याने कापण्याचे परिपत्रक काढल्याने या निर्णयाच्या विरोधात लढण्याचा निर्धार कामगार संघटनेने केला असल्याचे नाशिक विभागीय अध्यक्ष विजय पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.  ज्या २००५ नियमाच्या आधारे वेतन कपातीची दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे मुळात हा आदेशच चुकीचा असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.  यासंदर्भात पवार यांनी सांगितले की, २००१ मध्ये कर्नाटक सरकारच्या एक सदस्यीय खंडपीठाने संपावर जाणाºया एस.टी. कर्मचाºयांचा एका दिवसासाठी आठ दिवसांचा पगार कपात करण्याचा निर्णय दिला होता. सदर खंडपीठाचा निर्णय त्याच वर्षी द्विसदस्यीय खंडपीठाने रद्दबातल ठरविला होता.  असे असतानाही महाराष्टÑ राज्य परिवहन महामंडळाने २००५ मध्ये या खंडपीठाचा आधार घेऊन दंडात्मक कारवाई म्हणून एकास आठ दिवस पगार कपात होऊ शकते, असा नियमच करून टाकला. याच आधारे आता दंडात्मक कारवाईचा फतवा काढण्यात आला आहे. १७ डिसेंबर २०१५ मध्ये इंटकने पुकारलेल्या संपानंतर एसटीने एक दिवसाच्या बदल्यात आठ दिवसांचा पगार कपातीचा निर्णय घेतला होता. त्यास एस.टी. कामगार संघटनेने नाशिक औद्योगिक न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावेळी औद्योगिक न्यायालयाने एस.टीचा निर्णय रद्द ठरविला होता. एका दिवसासाठी आठच काय एकाही दिवसाचे वेतन कपात करता येणार नाही, असा अभिप्राय न्यायालयाने नोंदविला होता. या निर्णया नुसार कर्मचाºयांचे वेतन कपात करू दिले नव्हते. यानिर्णयाच्या आधारेच आताही वेतन कपात होऊ देणार नाही. आधार घेत नाशिक विभागातील एकाही कर्मचाºयाचे वेतन कपात करू दिले जाणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.- विजय पवार,  नाशिक विभागीय अध्यक्ष