शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

हा सत्तेचा उन्माद की स्वपक्षावरील राग?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:16 IST

नाशिक : केंद्रात व राज्यात सत्ता असल्यामुळे नाशिककरांनी महापालिका निवडणुकीत एकहाती सत्ता सोपविली. अन्य पक्षांतून आयात केलेल्यांना उमेदवारी देऊन ...

नाशिक : केंद्रात व राज्यात सत्ता असल्यामुळे नाशिककरांनी महापालिका निवडणुकीत एकहाती सत्ता सोपविली. अन्य पक्षांतून आयात केलेल्यांना उमेदवारी देऊन कोणाच्याही कुबड्या न घेता स्वबळावर सत्ता मिळालेल्या भाजपचा उन्माद तर तेव्हाच वाढला जेव्हा राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांनी ‘नाशिक दत्तक’ घेतल्याची घोषणा केली. त्यामुळे जेथे पालकच राज्याचा प्रमुख असेल तेथे त्याच्या बालकांकडून काही तरी प्रमाद घडेलच याविषयी शंका घेण्यास कोणताही वाव नसला तरी, सत्तेची हवा इतक्या लवकर भाजपच्या डोक्यात जाणार नाही याविषयी नाशिककर खात्री बाळगून होते. परिणामी गेली चार वर्षे भाजपवर विश्वास ठेवून महापालिकेच्या सत्तेच्या चाव्या सोपविलेल्या नाशिककरांच्या पदरी काय पडले हा संशोधनाचा विषय असला तरी, भाजपचे मूळ असलेल्या व निवडून आलेल्या नगरसेवकांना काय मिळाले हा नेहमीच वादाचा विषय राहिला आहे. महापौरपदाचे एकमेव अपवाद वगळता महापालिकेचे उपमहापौरपद असो वा स्थायी समिती सभापती, सदस्य, प्रभाग समित्यांचे सभापती अशा साऱ्याच पदांवर मूळ भाजपला बाजूला सारून अन्य पक्षांतून आयात केलेल्यांना पदांची खिरापत वाटण्यात आली. सातत्याने त्याच त्याच चेहऱ्यांना मिळणारी संधी व काही ठराविक लोकांच्या भोवतीच महापालिकेचे फिरणारे राजकारण पाहता, खासगीत भाजपच्या नगरसेवकांच्या होणाऱ्या मानसिक व आर्थिक कोंडींच्या अनेक चर्चा आजही कायम आहेत. मात्र, फरक फक्त इतकाच आहे की, नगरसेवकांच्या होणाऱ्या कोंडमाऱ्याला जागा करून देण्याची कोणतीच सोय पक्षात उरली नसल्याने त्याला कदाचित कोरोनाचे कारण मिळाले असावे. नगरसेवक प्रियंका घाटे यांच्या बंधूंचे कोरोनाने झालेले निधन असो वा काल-परवा बिटको रुग्णालयात धुडगूस घालणाऱ्या भाजप नगरसेविका पती राजेंद्र ताजणे यांच्या वडिलांचा मृत्यू. दोन्ही घटना दुर्दैवी व क्लेषदायक असल्या तरी, या घटनेच्या निमित्ताने रुग्णालये, डॉक्टर, परिचारिकांवर केले गेलेले हल्ले व महापालिकेत असलेल्या आपल्याच सत्तेवर सोडण्यात आलेले वाग्बाण पाहता, कोरोनाचे निव्वळ निमित्त असावे, त्या आड महापालिकेत सत्तेची पदे उपभोगणाऱ्यांच्या विरोधातील रागच अधिक असावा, असे वाटण्यास पुरेपूर वाव आहे. पती राजेंद्र ताजणे यांच्या कृत्याचे अप्रत्यक्ष समर्थन करताना नगरसेविका सीमा ताजणे यांनी महापालिकेच्या कारभाराचेच वाभाडे ज्या पद्धतीने काढले ते पाहता, गेल्या चार वर्षांत भाजपांतर्गत नगरसेवकांमध्ये सारेच काही आलबेल चालले होते व स्वपक्षाच्या सत्तेविषयी त्यांना ममत्व होते असे वाटत नाही. नाही तरी, अधूनमधून दिनकर पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ नगरसेवकाने पक्षाला व नेतृत्वाला दिलेला घरचा अहेर पाहता, पक्षात जे काही चालले ते व्यक्तिगत न घेता ती सामूहिक भावना असावी, असे मानण्यास हरकत नाही. तसेही आता सत्तेची साडेचार वर्षे संपुष्टात येऊ पाहत आहेत. या काळात काय केले याचा लेखाजोगा प्रत्येक नगरसेवकाला येत्या सहा महिन्यांत जनतेसमोर ठेवावाच लागणार आहे. त्यामुळे कदाचित निमित्त कोणतेही का असेना स्वकीयांवर राग काढून जनतेविषयी ममत्व दाखविण्याची कोणतीही संधी यापुढे कोणी भाजपचा नगरसेवक सोडेल याची खात्री कोणीच देऊ शकणार नाही.