शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरील भाजीबाजार स्थलांतराचा प्रश्न कायम

By admin | Updated: June 3, 2017 00:18 IST

सातपूर : रस्त्याच्या कडेला अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्या भाजीविक्रेत्यांना स्थलांतरित करण्यासाठी मनपाकडून पूर्व तयारी करण्यात आली होती

लोकमत न्यूज नेटवर्कसातपूर : सातपूर गावातील रस्त्याच्या कडेला अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्या भाजीविक्रेत्यांना मंडईत स्थलांतरित करण्यासाठी मनपाकडून पूर्व तयारी करण्यात आली होती. त्यासाठी जागेची मोजणी करून आखणीदेखील केली होती. मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी का झाली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.श्री छत्रपती शिवाजी महाराज मंडईतील भाजीविक्रे त्यांनीच पुढाकार घेऊन मनपा विभागीय अधिकारी राजेंद्र गोसावी यांची भेट घेऊन रस्त्यावरील भाजीविक्रे त्यांचे अतिक्र मण हटविण्याची मागणी केली होती. या विक्रे त्यांना मंडईत असलेल्या जागेवर कायमस्वरूपी स्थलांतरित करण्यात यावे आणि रस्ता कायमस्वरूपी मोकळा करावा. सणासाठी बसणाऱ्या विक्रेत्यांनादेखील मंडईत बसविण्यात यावे, पार्किंगची सोय करावी, मंडईतील शौचालयाची नियमित साफसफाई करावी, पाण्याची सोय करावी, यांसह विविध मागण्या करण्यात आल्या होत्या.या मागणीची दखल घेत विभागीय अधिकारी राजेंद्र गोसावी यांनी मनपा कर्मचाऱ्यांना निर्देशित केले होते. त्यानुसार या कर्मचाऱ्यांनी मंडईतील अतिरिक्त जागेची मोजणी करून जागेची आखणीदेखील केली होती. आखणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना भाजीविक्रेता व्यावसायिकांकडून सहकार्य केले होते. यानंतर खूप दिवसांचा कालावधी लोटला आहे. महापालिकेच्या निवडणुका झाल्या आहेत. आता तरी विभागीय अधिकाऱ्यांनी लक्ष घालून हा वाद मिटवावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.