शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामी नववर्ष आज संध्याकाळपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 01:12 IST

इस्लामी कालगणनेच्या हिजरी सन १४३९ला आज संध्याकाळपासून प्रारंभ होण्याची शक्यता वर्तविली जात होती; मात्र चंद्रदर्शन राज्यात कोठेही घडले नाही. शहरातून चंद्रदर्शन घडल्याची ग्वाही प्राप्त होऊ शकली नाही. शुक्रवारी संध्याकाळपासून नववर्षाला प्रारंभ होणार असल्याचा निर्णय धर्मगुरूंकडून बैठकीत घेण्यात आला.

नाशिक : इस्लामी कालगणनेच्या हिजरी सन १४३९ला आज संध्याकाळपासून प्रारंभ होण्याची शक्यता वर्तविली जात होती; मात्र चंद्रदर्शन राज्यात कोठेही घडले नाही. शहरातून चंद्रदर्शन घडल्याची ग्वाही प्राप्त होऊ शकली नाही. शुक्रवारी संध्याकाळपासून नववर्षाला प्रारंभ होणार असल्याचा निर्णय धर्मगुरूंकडून बैठकीत घेण्यात आला.गुरुवारी (दि.२१) उर्दू महिना ‘जिलहिज्जा’ची २९ तारीख असल्याने संध्याकाळी चंद्रदर्शन घडण्याची शक्यता वर्तविली जात होती. या पार्श्वभूमीवर शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्या अध्यक्षतेखाली शाही मशिदीत बैठक झाली. ढगाळ हवामानामुळे रात्री उशिरापर्यंत चंद्रदर्शन कोठेही घडल्याची माहिती नाशिक विभागीय चांद समितीला मिळाली नाही. चांद समिती व धर्मगुरूंच्या झालेल्या बैठकीत चालू महिन्याचे तीस दिवस पूर्ण करून शुक्रवारी संध्याकाळपासून हिजरी सन १४३९चा पहिला महिना मुहर्रमची एक तारीख सुरू होईल, असे जाहीर करण्यात आले. इस्लामी कालगणनेचा पहिला महिना म्हणून ‘मुहर्रमुल हराम’ ओळखला जातो. हा महिना धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या प्रिय कन्या हजरत फातिमा यांचे पुत्र शहीद हजरत इमाम-ए-हूसेन यांच्या स्मृतींना उजाळा देणारा आहे.