नाशिक : इंडियन स्पोर्टस अरेबिक अॅण्ड फिटनेस फेडरेशन यांच्यातर्फे गोवा येथे आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी इश्मा देशमुख याने सुवर्णपदक पटकावले आहे.जागतिक पातळीवर आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत विविध १७ देशांतील खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेतील खेळाडूंना रशियाच्या प्रशिक्षकांकडून या स्पर्धेसाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आले. गेल्या पाच वर्षांपासून सी.बी.एस.ई. शाळांच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत नियमित सहभाग नोंदवला आहे.
गोवा येथील स्पर्धेत इश्माला सुवर्णपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 18:35 IST