शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
2
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
3
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
प्रत्येक शेअरवर ५०,००० रुपयांचा फायदा; ना बोनस, ना स्टॉक स्प्लिट तरीही गुंतवणूकदार झाले मालामाल
5
रॉबर्ट वाड्रांची ED कडून १८ तास चौकशी; चार्जशीटही दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...
6
"दुसऱ्याच दिवशी वडील वारले, ठरलेलं लग्न मोडलं...", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने सांगितली लाबुबू डॉलची भयानक स्टोरी
7
IT आणि बँकिंग शेअर्समध्ये मोठी पडझड; पण, टाटांच्या 'या' शेअर्ससह २ स्टॉक्सनी वाचवली इज्जत!
8
"शाकिबला मीच घरी आणलं पण पत्नीने त्याच्यासोबत..."; घरगुती वादातून तरुणाने स्वतःला संपवलं, व्हिडीओही काढला
9
“प्रताप सरनाईकांनी एकदा तरी शिवनेरीने प्रवास करावा”; बसची दुरवस्था, प्रवाशांचा संताप
10
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
11
"खूप मारलं, उपाशी ठेवलं, गोळ्या देऊन गर्भपात..."; सासरी अमानुष छळ, 'तिने' आयुष्य संपवलं
12
वडापाव, समोसा... आता वर्तमानपत्रात गुंडाळल्यास दुकान बंद? 'या' चुकीमुळे ७५ वर्षांची बेकरी झाली सील!
13
दहाव्यांदा बोनस शेअर देणार 'ही' मल्टीबॅगर कंपनी; १८ जुलै आहे रेकॉर्ड डेट, तुमच्याकडे आहे का?
14
बक्सरचा शेरु! ज्याची रुग्णालयात गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तो चंदन मिश्रा कोण?
15
डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, तारीखही ठरली; पाक मीडियाचा मोठा दावा
16
IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे भारतीय!
17
'मलाही अनेकदा भाजपची ऑफर दिली गेली'; प्रणिती शिंदेंचं विधान, काँग्रेसची सत्ता न येण्याचं सांगितलं कारण
18
२०२५ पेक्षा २०२६ असेल अधिक भयंकर, युद्ध, भूकंप, महापूर, होणार प्रचंड विध्वंस, उत्पन्नाची साधनं संपणार
19
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...

सिंचन, पेयजलाचा प्रश्न गंभीर

By admin | Updated: January 10, 2016 22:14 IST

येवल्याचे पाणी पेटणार : सोमवारी जलहक्क संघर्ष समितीचे आमरण उपोषण

 येवला : तालुक्याला थोडासा दिलासा देऊ शकणारे पालखेड डाव्या कालव्याचे पाणीही आता येवल्याला मिळणे मुश्कील झाले आहे. या परिस्थितीत पाण्याच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले नाहीतर येवल्याला पिण्याचे पाणी मिळणेही मुश्कील होईल. सातत्याने दुष्काळाचा सामना करणाऱ्या येवला तालुक्यातील सिंचनाचा, पेयजलाचा एकूण प्रश्न ऐरणीवर आला आहे. येवल्याचा सिंचनाचा व पेयजलाचा प्रश्न सोडवायचा असेल तर १६ मागण्या मान्य करा व येत्या २० वर्षांतील येवला तालुका व शहराची लोकसंख्या गृहीत धरून पाण्याचा प्रश्न सोडवावा, यासाठी समितीचे कार्यकर्ते येवला तहसील कार्यालयासमोर ११ आॅगस्टपासून आमरण उपोषणास बसणार आहेत. या विषयाचे निवेदन जलसंपदा तथा पालकमंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री छगन भुजबळ तसेच विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी दीपेंद्र कुशवाह, पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंपी, लघुसिंचन जलसंधारणचे मुख्य अभियंता के. एस. ठाकरे, गिरणा खोरे प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता अनिल मोरे, प्रांताधिकारी वासंती माळी, तहसीलदार शरद मंडलिक यांना देण्यात आले. जलहक्क संघर्ष समितीने सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी निवेदनात विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यात कोळगाव येथील कोळगंगा नदीवर असलेल्या पाझर तलावाची क्षमता दुप्पट करावी, मांजरपाडा-१ प्रकल्प पूर्ण करून पुणेगाव-डोंगरगाव कालव्याला पाणी पोहोच करण्याचा कालबद्ध कार्यक्र म जाहीर करावा, संपूर्ण तालुक्यातील अनकाई डोंगराच्या रांगा आणि दक्षिणेस असलेल्या गोदावरी नदीदरम्यान तालुक्यातील सर्व नदीपात्रांमध्ये पाच दलघफूचे सीमेंट साखळी बंधारे बांधावे, सर्व नद्या- नाल्यांचे रुंदीकरण, खोलीकरण करावे व पाणी अडवावे आदि मागण्यांच्या समावेश आहे. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी तहसील कार्यालयासमोर घंटानाद केला जाऊन मागण्यांचे निवेदन दिल्यानंतर उपोषणास प्रारंभ होणार आहे, अशी माहिती देण्यात आली. तसेच ज्या गावांची पालखेडच्या पाण्यातून आरक्षित बंधारे भरून देण्याची मागणी आहे अशा गावांमधून शेतकरीवर्गाने व सर्व राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे व आंदोलनात आपला सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे. (वार्ताहर)