शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

समाजमाध्यमांचा बेजबाबदार वापर घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 00:31 IST

आजच्या आधुनिकतेच्या युगात समाजमाध्यमांचा (सोशल मीडिया) वापरात बेजबाबदार व बेभानपणा अधिक वाढत असून, तो समाजाच्या जडणघडणीसाठी घातक ठरणारा आहे. त्यामुळे सोशल मीडिया हाताळताना समाजाच्या जडणघडणीवर त्याचा विपरीत परिणाम होणार नाही, याबाबत एक सुजाण नागरिक म्हणून खबरदारी बाळगणे गरजेचे आहे,

नाशिक : आजच्या आधुनिकतेच्या युगात समाजमाध्यमांचा (सोशल मीडिया) वापरात बेजबाबदार व बेभानपणा अधिक वाढत असून, तो समाजाच्या जडणघडणीसाठी घातक ठरणारा आहे. त्यामुळे सोशल मीडिया हाताळताना समाजाच्या जडणघडणीवर त्याचा विपरीत परिणाम होणार नाही, याबाबत एक सुजाण नागरिक म्हणून खबरदारी बाळगणे गरजेचे आहे, असा सूर ‘माध्यमवेध’ चर्चासत्रातून उमटला.सिंधूताई मोगल संदर्भ ग्रंथालयाच्या वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य न्यास, नाशिक सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित ‘माध्यमवेध’ विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. शंकराचार्य संकुलात झालेल्या या चर्चासत्राप्रसंगी शेफाली वैद्य, अ‍ॅड. सुशील अत्रे यांनी सहभागी होत समाजमाध्यमांचा वापरातील बेजबाबदारपणा यावर मंथन घडवून आणले. यावेळी वैद्य यांनी आपले मत मांडताना सांगितले, सोशल मीडिया हा अनियंत्रित आहे; मात्र पारंपरिक मीडिया नियंत्रित स्वरूपाचा असूनदेखील अतीउत्साहीपणे एखाद्या घटनेचे वार्तांकन करत चुकीच्या बातम्या दिल्या जात असल्याची टीका त्यांनी केली. भविष्यात ‘डेटा थेफ्ट’ हे आव्हानात्मक ठरणार असून, आतापासून सावध होणे गरजेचे आहे. समाज माध्यमांवरील एखादी माहिती पुढे पाठविण्यापूर्वी सत्यता तपासून घेतली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. लेखी किंवा तोंडी स्वरूपात एखादी व्यक्ती अथवा संस्थेविषयी टीका करणे किंवा बदनामीकारक मजकूर प्रसारित करणे हा गुन्हा ठरतो. तसेच मजकूर पुढे ‘फॉरवर्ड’ केला तरीदेखील लिखाण करण्याइतकीच शिक्षा व त्याच स्वरूपाचा गुन्हा ठरतो, असे अत्रे यांनी यावेळी सांगितले. सूत्रसंचालन शरदमणी मराठे यांनी केले.माहितीचा महापूरसमाजमाध्यमांमधून विविध विषयांवरील माहितीचा महापूर दररोज ओसंडून वाहत असतो. त्यामुळे अनावश्यक व कुठलाही आधार नसलेली बेभरवशाच्या माहितीची देवाण-घेवाण सोशल मीडियाद्वारे होऊ लागली असून, ही समाजाच्या दृष्टीने हितावह तर मुळीच नाही; मात्र चिंताजनक बाब नक्कीच आहे. त्यामुळे आपण या समाजाचे सुजाण नागरिक आहोत, याची जाणीव ठेवून सुरक्षित व सतर्कपणे सोशल मीडिया हाताळावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

टॅग्स :Mobileमोबाइल