शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
3
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
4
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
5
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
6
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
7
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
8
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
9
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
10
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
11
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
12
९० खाजगी जेट, ३० वॉटर टॅक्सी... पण लग्नपत्रिकेवरुन ट्रोल! बेझोस-सांचेझ यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल!
13
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
14
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
15
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
16
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
17
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
18
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
19
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
20
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!

उज्जैन कुंभमेळ्याचे साधू-महंतांना निमंत्रण

By admin | Updated: September 20, 2015 23:32 IST

उज्जैन कुंभमेळ्याचे साधू-महंतांना निमंत्रण

त्र्यंबकेश्वर : मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिली भेटत्र्यंबकेश्वर : एप्रिल २०१६ मध्ये उज्जैन येथे भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे निमंत्रण मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी त्र्यंबकेश्वर येथे असलेल्या दहाही आखाड्यांना सपत्नीक जाऊन दिले.श्री निरंजनी पंचायती निरंजनी आखाडा येथे चौहान यांनी आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्रगिरी महाराज यांना निमंत्रण दिले. यावेळी निरंजनी आखाड्याचे श्री महंत तथा सचिव रामानंद पुरीजी, श्री महंत आशिश गिरीजी, श्री महंत रवींद्रपुरीजी आदिंसह साधू-महंत उपस्थित होते. जिल्हाधिकारी दीपेन्द्रसिंंह कुशवाह, मेळा अधिकारी महेश पाटील, प्रातांधिकारी बाळासाहेब वाकचौरे तसेच पोलीस उपविभागीय अधिकारी प्रवीण मुंडे (आय पी एस) आदि अधिकारी उपस्थित होते. त्र्यंबकमधील श्रीनिरंजनी पंचायती आखाडा, श्री महानिर्वाण आखाडा, श्री पंचायती उदासीन बडा आखाडा, श्री पंचायती उदासीन तथा आखाडा, श्री अटल आखाडा, श्री निर्मल आखाडा, श्री अग्नी आखाडा, श्री आवाहन आखाडा, श्री शंभू पंच जुना आखाडा व श्री पंचायती आनंद आखाडा या दहा आखाड्यांसह त्र्यंबकेश्वरला सध्या असलेल्या आचार्य महामंडलेश्वर, श्रीगुरु कार्ष्णि, विश्वात्मानंद गिरीजी आदिंनाही मुख्यमंत्र्यांनी निमंत्रण दिले. या दौऱ्यात त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले. कुशावर्त तीर्थावरही चौहान यांनी दर्शन-पूजन केले. (वार्ताहर)