शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

गुंतवणूकदार, संचालक आमने-सामने

By admin | Updated: June 19, 2016 00:33 IST

महिन्याची मुदत : ..तर कायदेशीर कारवाई

नाशिक : ‘हाउस आॅफ इनव्हेस्टमेंट’चे संचालक संशयित विनोद पाटील यांनी बोलविलेल्या पत्रकार परिषदेची कुणकुण गुंतवणूकदारांना लागताच शेकडो गुंतवणूकदार येथे जमले. दरम्यान, पाटील यांनी सर्व गुंतवणूकदारांना महिनाभरात व्याज अथवा रक्कम परत दिली जाईल, असे आश्वासन देत कुठल्याहीप्रकारे घोटाळा केला नसल्याचा दावा केला; मात्र गुंतवणूकदारांनी सर्व काही संशयास्पद असून, मागील तीन महिन्यांपासून आश्वासनांचा पाऊस पाटील यांच्याकडून पाडला जात असल्याचा आरोप केला.पत्रकार परिषदेप्रसंगी गुंतवणूकदारच जास्त संख्येने हजर होते. ‘हाउस आॅफ इनव्हेस्टमेंट’ कंपनीनेही हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांना गंडा घातल्याच्या आरोपाचे संशयित संचालक विनोद पाटील यांनी खंडन केले. गुंतवणूकदारांना २४ टक्के व्याजाचे आमिष दाखविण्यात आले होते; मात्र कंपनीने काही महिन्यांपासून व्याजाची रक्कम देणेच बंद केले व पैसेही परत करण्यास नकार देत काही दिवसांनी गुंतवणूकदारांशी संवाद साधणे बंद केले सुमारे तीन हजारांपेक्षा अधिक या कंपनीचे शहरात गुंतवणूकदार असल्याचे यावेळी उपस्थित काही गुंतवणूकदारांनी सांगितले; मात्र पाटील यांनी केवळ ४२३ गुंतवणूकदार असून, केवळ ‘हाउस आॅफ इनव्हेस्टमेंट’ ही एकच कंपनी कार्यरत असून, उर्वरित पाचही कंपन्या बंद झाल्याचे पाटील यावेळी म्हणाले. सर्व गुंतवणूकदार हे ‘हाउस आॅफ इनव्हेस्टमेंटचे असल्याचे ते म्हणाले. या कंपनीचे तीस एजंट असून, २९ कर्मचारी असल्याची माहिती देत महिनाभरात कंपनीचे सर्व आर्थिक व्यवहार सुरळीत होतील, असा दावा पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.