शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात उद्योजकांकडून होणार पावणेदोन हजार कोटींची गुंतवणूक

By admin | Updated: June 1, 2017 02:16 IST

मुंबई : मुंबईत आयोजित मेक इन नाशिक प्रदर्शनातील दोन दिवसांत नाशिक जिल्ह्यात २८ विविध उद्योगांनी १ हजार ८७५ कोटी रु पयांची गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली

 गोकुळ सोनवणे। लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत आयोजित मेक इन नाशिक प्रदर्शनातील दोन दिवसांत नाशिक जिल्ह्यात २८ विविध उद्योगांनी १ हजार ८७५ कोटी रु पयांची गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली असून, तसे लेखी पत्र निमाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यातील ९५ टक्के कंपन्या नाशिक जिल्"ातील आहेत. चार पैकी दोन मुंबईतील आहेत. तर एक कंपनी लंडन येथील आहे. या सर्व उद्योगांचा विचार करता जवळपास एक हजार एकर जागा लागण्याची शक्यता आहे.नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी निमाच्या वतीने मुंबईत ‘मेक इन नाशिक’ या उपक्रमाचे नेहरू सेंटर येथे दोन दिवस आयोजन करण्यात आले होते. गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकला एकही मोठा उद्योग प्रकल्प आलेला नसल्याने जिल्"ाचे ब्रॅँडिंग करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्या. राज्य सरकारने यापूर्वी मुंबईत आयोजित केलेल्या मेक इन इंडिया प्रकल्पात ज्या कंपन्यांनी महाराष्ट्र आणि नाशिकमध्ये गुंतवणुकीत स्वारस्य असल्याचे दर्शविले होते त्यांचे प्रस्ताव राज्य शासनाच्या उद्योग विभागाने निमालाही पाठविले होते. त्याआधारे निमाने पाठपुरावा केल्यानंतर पुन्हा एकदा या कंपन्यांनी स्वारस्य दाखवले होते. तथापि, दोन दिवसांत गुंतवणुकीसाठी इच्छा प्रदर्शित करणारे २८ पैकी २४ उद्योग नाशिकचेच आहेत. नोबेल हाईजिन, डेल्टा स्पीन टेस्ट या दोन कंपन्या मुंबईच्या असून श्रीवेदा सत्व श्रीश्री रविशंकर ही कंपनी बाहेरील आहे. युरोपिअन मेटल सेंट्रल ही कंपनी लंडन येथील आहे. या कंपनीने २७० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव एमआयडीसीकडे सादर केला होता. त्याचीही प्रत प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील यांनी निमाला सादर केली. त्यामुळे प्रस्ताव सादर करणाऱ्या उद्योगांपैकी चार उद्योग बाहेरील आहेत.